
प्रत्येक माणसाने सात ते आठ तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. सात ते आठ तासांपेक्षा कमी झोप झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. तसेच बहुतेक लोकांना रात्री चांगली झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर चिडचिड होते. जे लोक नीट झोप घेत नाहीत त्यांच्यासाठी ही खरोखरच अतिशय गंभीर समस्या आहे.
तर कधी रात्री उशिरापर्यंत झोप लागते. त्यामुळे सकाळी उठल्यावर अपुऱ्या झोपेमुळे सतत चिडचिड होत असते. त्यात कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. अशावेळी कामातही काही चुका होतात. जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल आणि तुम्हाला रात्री ७-८ तास झोप येत नसेल तर तुम्ही काळे मनुका आणि केशर पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसेल.
न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या म्हणण्यानुसार, झोप येत नसेल तर तुम्ही काळे मनुका आणि केशरचे सेवन करावे. हे दोन्ही नैसर्गिक घटक आहेत जे झोप येण्यास मदत करतात आणि तुम्ही पुरेशी झोपू घेऊ शकता. यावेळी त्यांनी सांगितले कि, केशर आणि काळ्या मनुकाचे सेवन केल्याने शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिन या हार्मोन्सच्या पातळीत वाढ होते. जी चांगली झोप येण्यासाठी जबाबदार असतात. तसेच तुमचा मूड व आत्मविश्वास सकारात्मक पद्धतीने वाढवण्यास देखील मदत करतात.
या दोन गोष्टी तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत करतील
काळे मनुके – या मनुकामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट पॉलीफेनॉल आणि रेझवेराट्रॉल असतात, जे आपल्या झोपेच्या-जागे होण्याच्या चक्राचे नियमन करत असतात .
केशर- केशरचा समावेश मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. केशर हे औषधीय गुणधर्म असलेला पदार्थ आहे. तर केशर मध्ये सॅफ्रानलसारखी संयुगे असतात, जे सेरोटोनिनची पातळी वाढवतात. जे झोप येण्यास मदत करतात.
एका बाऊलमध्ये १०० मिली पाणी घ्या. त्यात ३-४ मनुके आणि ३-४ केशर तंतू घालून ४-६ तास पाण्यात ठेवा. रात्री झोपण्याच्या एक तास आधी मनुके व केशराचे सेवन करा. त्याच बरोबर पाणी देखील प्यावे. असे काही दिवस मनुके आणि केशरचे सेवन नियमित केल्यास तुमची झोप न येण्याची समस्या दूर होईल.