आधी दूध की पाणी? काय टाकायचं? 99 टक्के लोकांना माहित नसेल चहा बनवण्याची योग्य पद्धत

अनेकांची सकाळ ही चहाशिवाय सुरु होत नाही. पण अनेकांना चहा हा योग्य पद्धतीने कसा बनवावा हे माहित नाही. कारण चहा बनवताना आधी दूध टाकायचं की पाणी यामध्ये अनेकांना गोंधळ होतो. चला जाणून घेऊयात.

आधी दूध की पाणी? काय टाकायचं? 99 टक्के लोकांना माहित नसेल चहा बनवण्याची योग्य पद्धत
How to make perfect tea
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 8:28 PM

आपल्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे आवडते. भारतात चहा हा फक्त गरम पेयाचा कप नसून सर्वांच्या मनाजवळचं पेय आहे. कारण सकाळी एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र हा रोजचा दिनक्रम बनला आहे. घर असो वा ऑफिस, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचे असते तेव्हा लोक अनेकदा चहावर चर्चा करतात.किंवा काम करून थकवा आला असल्यास आपल्याला फ्रेश होण्यासाठी एक कप चहाच आठवतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की चहा योग्य पद्धतीने बनवायचा कसा? म्हणजे चहा बनवताना आधी दूध घालाव की पाणी याबाबत एक गोंधळ असतो. चला जाणून घेऊयात.

चहा बनवण्याची योग्य पद्धत

चहा बनवण्यासाठी काहीजण दूध घालतात. म्हणजे थेट दुधातच चहा करतात. पण तसे करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे चहा बनवताना आधी दूध नाही तर पाणी घ्यावे. मग पुढील कृती करावी.

कृती

कच्चे दूध असल्यास:  सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 कप पाणी घ्या. चहाच्या कपाप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. एका कप चहासाठी अर्धा चमचा चहापत्ती वापरता येईल. जर कच्चे दूध वापरणार असाल तर सर्वप्रथम, पाणी थोडे गरम करा, मग त्यात दूध घाला ते एक मिनिटांपर्यंत चांगले उकळवू द्या. त्यानंतर त्यात चहापत्ती घाला. अशा प्रकारे, चहामध्ये कच्चेपणाची चव राहणार नाही. आणि कोणत्याही कारणास्तव दूध फाटणार नाही.

तापवलेले दूध:  जर दूध आधीच तापवलेलं असेल तर प्रथम पाणी उकळवा आणि नंतर चहापत्ती घाला. काहीवेळाने मग त्यात दूध घाला आणि त्यानंतर चहा चांगला उखळू द्या. साखर टाकण्यासंदर्भात तुम्ही ठरवू शकता. कारण ती प्रत्येकाच्या चवीप्रमाणे असते. आणि साखर विरघळण्यास जास्त वेळही लागत नाही, म्हणून तुम्ही ती कधीही घालू शकता.

चहा किती मिनिटे उकळणे योग्य?

चहाला योग्य चव देण्यासाठी, तो कमीत कमी 5 ते 6 मिनिटे उकळवा. यामुळे चहा कच्चा वाटणार नाही आणि त्याला चांगली चवही येईल.