रंगमपचंमीच्या दिवशी अशी घ्या केस, त्वचेची काळजी, तज्ञ काय सांगतात ?

रंगमपचंमी हा सण बहुतेक लोकांना आवडतो. लोक एकमेकांना रंग लावून उत्साहाने हा सण साजरा करतात. परंतु रंगांमध्ये असलेले कॅमिकल त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, तज्ञांनी दिलेल्या या टिप्स या समस्या टाळण्यास मदत करू शकतात. चला जाणुन घेऊयात...

रंगमपचंमीच्या दिवशी अशी घ्या केस, त्वचेची काळजी, तज्ञ काय सांगतात ?
रंगापासून अशी वाचवा त्वचा आणि केस
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Mar 13, 2025 | 8:00 AM

होळी हा सण रंगांचा, आनंदाचा आणि मौजमजेचा असतो. प्रत्येकजण एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावुन हा सण मोठ्या आंनदाने साजरा करतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे रंग उपलब्ध आहेत. पण त्यातील काही रंग आपल्या त्वचेला आणि केसांनाही नुकसान पोहोचवू शकतात. कारण बाजारात मिळणारे काही रंगामध्ये कॅमिकल मिक्स केलेले असतात. त्यामुळे हे रंग केसांवर आणि त्वचेवर लावल्यास त्यांचे दुष्परिणाम दिसू लागतात. तसेच हे रंग एवढे हानिकारक असतात की यामुळे केस गळती आणि त्वचेवर पुरळ येणे, चेहरा लाल पडणे अशा समस्या निर्माण होतात.

होळीच्या रंगांमध्ये अनेकदा कॅमिकल आणि कृत्रिम रंग मिक्स केलेले असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ, खाज सुटणे आणि ॲलर्जी यांसारख्या समस्या निर्माण होतात. जर तुमची त्वचा आधीच संवेदनशील असेल तर हे कॅमिकल मिक्स केलेले रंग तुमच्या त्वचेला जास्त नुकसान पोहोचवु शकतात. त्याचबरोबर केसांच्याही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कॅमिकलयुक्त रंगााचा वापर करण्याऐवजी तुम्ही या रंगपंचमीला फक्त नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हल्ली बाजारपेठेत रंगपंचमीला वापरले जाणारे नैसर्गिक रंग देखील मिळत आहेत. यंदाची रंगपंचमी आरोग्यदायी खेळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक रंगांचा वापर करू शकता. पण यामध्ये असे काही लोकं असतात जे स्वस्तात मिळणारे कॅमिकलयुक्त रंग वापरत आहे. अशा परिस्थितीत, त्या रंगांचा वापर केल्याने इतरांच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमची त्वचा आणि केसांचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया तज्ञांनी दिलेल्या खास सल्ल्याबद्दल…

तज्ञ काय सांगतात?

मेरठचे त्वचारोगतज्ज्ञ रॉबिन चुघ म्हणतात की रंगपंचमीच्या दिवशी त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या दिवशी रंगांमध्ये असलेले कॅमिकल त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवू शकतात. म्हणून रंगपंचमीच्या आधी तुमची तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर आणि केसांना हेअर सीरम लावा.

होळीच्या वेळी, तुम्ही तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावू शकता आणि केसांना हेअर मास्क लावू शकता जेणेकरून तुमची त्वचा आणि केस कॅमिकल रंगांपासून सुरक्षित राहतील. रंगपंचमीनंतर तुमची त्वचा आणि केस पूर्णपणे स्वच्छ करा. लक्षात ठेवा की रंग काढण्यासाठी त्वचेला जास्त जोरात घासू नका कारण यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुमच्या त्वचेवर सौम्य क्लींजर आणि केसांना शाम्पू लावा. याशिवाय, तुमची त्वचा आणि केस हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझर आणि केसांचे कंडिशनर वापरा.

त्वचेची काळजी

रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. हे तुमच्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांच्या तसेच रंगांच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करू शकतात. तुम्ही मॉइश्चरायझर देखील लावू शकता. रंगपंचमी खेळल्यानंतर लगेचच तुमची त्वचा पाण्‍याने स्वच्छ धुवा. त्वचेवर साचलेला रंग सहज निघून जाण्यासाठी सौम्य फेस वॉश आणि सौम्य साबण वापरा. तसेच, आंघोळ केल्यानंतर, शरीरावर बॉडी लोशन व चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

केसांची निगा राखणे

रंगपंचमी खेळताना जर तुम्हाला तुमचे केस कॅमिकल रंगांपासून वाचवायचे असतील तर तुम्ही शॉवर कॅप घालू शकता. किंवा केसांना आधल्या दिवशी हेअरमास्क लावा. यामुळे रंग केसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात. तसेच रंगपंचमी खेळून झाल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमचे केस व्यवस्थित धुवावेत. केस धुताना सौम्य शाम्पू वापरा. केसांना हलक्या हाताने शाम्पू लावा आणि नंतर केस चांगले धुवा आणि कंडिशनर वापरा, यामुळे केस मऊ राहण्यास मदत होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)