चहा आणि कॉफी प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो का? तज्ञांकडून जाणून घ्या

चहा आणि कॉफीचे अनेक चाहते आहेत. काही लोकांना चहा व कॉफी प्यायला खूप आवडते तर काहींना त्यांचे व्यसन असते. चहा किंवा कॉफी प्यायली नाही तर अनेकांची दिवसाची सुरूवात होत नाही. तर या दोन्हीमध्ये कॅफिन असते. त्यामूळे चहा आणि कॉफी प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो का याबद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

चहा आणि कॉफी प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो का? तज्ञांकडून जाणून घ्या
कॉफी, चहा
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 4:25 PM

आपण आपल्या आजूबाजूला अनेक कॉफीप्रेमी पाहिले असतील. अनेकांना तर दर अर्ध्या तासाने चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते. आजकाल चहा आणि कॉफीवरही मीम्स बनवले जात आहेत. तर सतत घेत असलेल्या या चहा व कॉफीमध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असे घटक असतात. कदाचित कॅफिनची तीव्र इच्छा लोकांना त्याची आवड निर्माण करते किंवा त्याचे व्यसन लावते. तुम्ही अनेकदा डॉक्टरांना असे म्हणताना ऐकले असेल की जास्त चहा आणि कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेक रुग्णांना ते न पिण्याचा सल्लाही दिला जातो. पण, कमी प्रमाणात चहा आणि कॉफी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो का? तर तुम्हाला ही असा प्रश्न पडला असेल तर आजच्या लेखात आपण तज्ञांकडून याचे योग्य उत्तर जाणून घेऊयात…

आपल्या देशात चहा आणि कॉफी हे एक सामान्य पेय बनले आहे. पाहुणे आले की, तुम्ही सर्वात आधी चहा आणि कॉफी त्यांना देतात. कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये यासाठी योग्य यंत्रे बसवण्यात आली आहेत. चहा आणि कॉफी हे केवळ चव किंवा छंदासाठी सेवन केले जात नाही. यामागे अनेक कारण आहेत. काही लोक चहा आणि कॉफी पितात कारण त्यांना त्यातून ऊर्जा मिळते. काही लोक चहा किंवा कॉफीचे व्यसन असल्यामुळे ते देखील पितात.

मानसिक ताण कमी होतो?

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संजीव त्यागी सांगतात की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. चहामधील एल-थिन हे घटक शांतता आणि विश्रांतीची भावना देते, तर कॉफीमध्ये कॅफिन भरपूर असते आणि त्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. दोन्ही पेये ताण कमी करण्यास मदत करू शकतात. तर तज्ञांच्या मते हे दोन्ही पेय मानसिक ताणतणावात आराम देतात, परंतु त्यांचे जास्त सेवन हानिकारक आहे.

दिवसातून किती वेळा चहा आणि कॉफीचे सेवन करावे?

जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा चहा किंवा कॉफीचे सेवन करू शकता. जर तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या असतील तर त्यांचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होईल. म्हणून चहा आणि कॉफी कमी प्रमाणात सेवन करावे. जर तुम्हाला ताण येत असेल तर चहा आणि कॉफीऐवजी तुम्ही नैसर्गिक आणि हर्बल पेये घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)