हिवाळ्यात टॉन्सिलच्या समस्येने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांनी मिळेल आराम

tonsil infection : हिवाळ्यात टॉन्सिल संदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सर्दी आणि खोकल्यामुळे टॉन्सिलला सूज येते. ज्यामुळे पाणी पितांना किंवा अन्न गिळताना देखील त्रास होतो. टॉन्सिलचा त्रास कमी कसा करावा. काय आहेत यावर घरगुती उपाय जाणून घ्या.

हिवाळ्यात टॉन्सिलच्या समस्येने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांनी मिळेल आराम
| Updated on: Nov 22, 2023 | 2:54 PM

Home Remedies For Tonsils : टॉन्सिल्स हे संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात. पण जेव्हा हे टॉन्सिल सुजतात तेव्हा वेदना होतात. काहीही खाल्ले किंवा पितांना सुद्धा त्रास होतो. हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. पंरतू टॉन्सिलचा त्रास अधिक काळापासून असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. टॉन्सिलला सूज आल्यानंतर त्याच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्की करु शकता.

मध आणि हळदीचे दूध

मध आणि हळद दुधात मिसळून प्यायल्याने यापासून आराम मिळू शकतो. मध आणि हळद या दोघांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे टॉन्सिलपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी गरम दुधात हळद आणि मध मिसळून प्या.

लवंग

लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. घसा खवखवत असेल तर त्यापासून आराम मिळू शकतो. टॉन्सिलला सूज आली असेल तर तोंडात काही लवंगा ठेवा, त्या चोळा आणि नंतर चावा.

तुळशीची पाने

तुळशीत अनेक औषधी गुण असतात. घसा खवखवत असेल किंवा, सर्दी आणि खोकल्यामुळे घसा दुखत असेल तर घरगुती उपाय करु शकता. यासाठी सर्वप्रथम तुळशीची पाने धुवा, नंतर ही पाने पाण्यात उकळा, नंतर गाळून घ्या, कोमट झाल्यावर प्या.

मिठाच्या पाण्याने गार्गल करा

टॉन्सिल दुखत असेल तर मिठाच्या पाण्याने गार्गल करू शकता. ज्यामुळे वेदना कमी होतात. याशिवाय सूजपासूनही आराम मिळू शकतो.