संडे हो या मंडे…. केसांसाठीही लावा अंडे ! फायदे तर जाणून घ्या

अंड्याचा वापर करून अनेक चविष्ट पदार्थ तयार करता येतात. पण अंड्याचा वापर केवळ खाण्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही करता येतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

संडे हो या मंडे.... केसांसाठीही लावा अंडे ! फायदे तर जाणून घ्या
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 07, 2023 | 2:19 PM

Egg For Hair Care : संडे हो या मंडे… रोज खाओ अंडे ! असं म्हटलं जातं. अंड्याचे (eggs) अनेक चविष्ट पदार्थ आपण खातो, पण सिल्की, मऊ, मुलायम आणि घनदाट केस (hair care) हवे असतील तर त्यासाठी अंड्याचा वापर करता येतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? अंडी केसांना खोलवर पोषण देतात. केसांसाठी अंड लावताना तुम्ही त्यात अनेक नैसर्गिक गोष्टी मिक्स करून वापरू शकता. हेअर मास्क (hair mask) प्रमाणे तुम्ही अंड्याचा वापर करू शकता. यामुळे केस तुटणे आणि केस दुभंगणे, अशा समस्याही कमी होतात.

अंड्यामध्ये प्रोटीन्स अधिक प्रमाणात असते. त्यामुळे केस हेल्दी आणि मजबूत होतात. केसांसाठी अंड्याचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

अंडी व नारळाचे तेल

एका बाऊलमध्ये एक अंडं फोडून घ्या. त्यात २ चमचे खोबरेल तेल घाला. दोन्ही मिक्स करा आणि हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा. हा मास्क केसांवर अर्धा तास लावून ठेवा, त्यानंतर, सौम्य शांपू ने केस धुवावेत.

अंड व मध

एका बाऊलमध्ये अंड फोडावे , त्यातील पिवळा बलक काढून वेगळा करा. आता या भांड्यात १ ते २ चमचे मध घाला. मध आणि अंड्याचे हे मिश्रण केसांना लाव आणि अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.

कोरफड आणि अंडी

एका बाऊलमध्ये एक अंडं फोडून त्यात दोन चमचे कोरफडीचा रस घालावा. हे नीट मिक्स केसांना व स्काल्पला लावावे. थोड्या वेळाने सौम्य शांपूने केस धुवून टाकावेत.

अंडी आणि दही

एका वाडग्यात अंडे फोडून घ्या. त्यात २ चमचे दही घाला. अंडी आणि दह्याची पेस्ट टाळूवर आणि केसांवर अर्धा तास लावा. नंतर सौम्य शांपूने स्वच्छ करा. अंड आणि दह्याचा हा पॅक तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

ऑलिव्ह ऑईल आणि अंडं

एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे ऑलिव्ह ऑईल घ्यावे, त्यात एक अंड मिसळावं. दोन्ही गोष्टी नीट मिसळून तो पॅक स्काल्प व केसांवर लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाकावेत. यामुळे केसांचे पोषण होते.

केवळ अंडही वापरू शकता

एका भांड्यात दोन अंडी फोडून ती नीट फेटून घ्या. ही पेस्ट केस व स्काल्पवर लावून 40 मिनिटे ठेवावे. त्यानंतर केस थंड पाण्याने आणि सौम्य शांपूने धुवावेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)