केसांसाठी वरदान ठरेल मेथीचे पाणी, या समस्या होतील लवकर दूर

| Updated on: Mar 24, 2023 | 4:28 PM

Methi Water For Hair : जर तुम्हीही केस गळण्याच्या किंवा तुटण्याच्या समस्येशी झगडत असाल तर तुम्ही तुमच्या केसांना मेथीचे पाणी लावा. त्यामुळे तुमच्या केसांची एकंदर स्थिती सुधारेल.

केसांसाठी वरदान ठरेल मेथीचे पाणी, या समस्या होतील लवकर दूर
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : खराब जीवनशैली, खराब अन्न, प्रदूषण, धूळ आणि माती यांचा आरोग्यावर आणि त्वचेवर (skin) परिणाम तर होतोच, पण त्यामुळे केसांच्या समस्याही वाढत आहेत. आजच्या युगात प्रत्येक दुसरी व्यक्ती ही केस तुटणे, केस गळणे (hair fall) याांसरख्या समस्यांनी त्रस्त आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनते. घामामुळे चिकटपणा, कोंडा, खाज येण्याची समस्याही वाढते. केसांच्या (hair problem) या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे शांपू आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात, पण त्यात हानिकारक केमिकल असल्यामुळे ते फायद्याऐवजी नुकसानच करतात.

जर तुम्हीही केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर एक खास घरगुती उपाय जाणून घ्या. याचा अवलंब करून केसांची परिस्थिती सुधारायला मदत होईल. केसांसाठी मेथीचे पाणी वापरू शकता, त्यामुळे केसांना फायदाच होईल.

मेथीचे पाणी केसांना लावण्याचे फायदे

हे सुद्धा वाचा

मेथीच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. ते केवळ केस तुटण्यापासून रोखत नाहीत तर त्यांना जाड, मजबूत आणि चमकदार बनवतात. मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले लोहाचे प्रमाण रक्ताभिसरण सुरळीत करून केसांना आतून मजबूत बनवते, तसेच कोंडा दूर करते.

कसे बनवाल मेथीचे पाणी ?

साहित्य

– मेथी 50 ग्रॅम
– एक ग्लास पाणी
– केसांना लावायचे तेल

कृती

– सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्या

– या पाण्यात मेथीचे दाणे टाका आणि रात्रभर भिजू द्यावेत.

– सकाळी हे पाणी गाळून वेगळ्या भांड्यात ठेवा.

– त्यामध्ये केसांना लावायचे तेलाचे काही थेंब मिसळा.

– हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये साठवून ठेवा.

मेथीचे पाणी लावण्यापूर्वी केस आधी शांपूने धुवून घ्यावेत. यामुळे स्काल्प नीट स्वच्छ होईल. त्यानंतर मेथीचे पाणी केसांच्या मुळाशी नीट पोहोचेल. केस नीट विंचरून त्याचे नीट भाग करा. नंतर त्यामध्ये स्प्रे बॉटलमधील मेथीचे पाणी केसांवर फवारावे. हे किमान 1 तास केस असेच राहू द्या, त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवून टाकावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)