AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय ? वेगाने गळतात तुमचे केस ? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो त्रास

आजकाल व्यस्त जीवनात, पुरेशा पोषक पदार्थांचे सेवन न केल्याने केस गळती सुरू होते. कोणत्या महत्वाच्या व्हिटॅमिनमुळे केसगळतीचा त्रास होतो ते जाणून घेऊया

काय ? वेगाने गळतात तुमचे केस ? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो त्रास
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 20, 2023 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली : केस गळणे हा (hair fall)आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक सामान्य भाग आहे, परंतु जर ते झपाट्याने गळू लागले तर ते चिंतेचे एक मोठे कारण ठरू शकते. एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, केस गळणे सामान्य आहे, कारण 50 टक्के पुरुष आणि महिलांना 50 व्या वर्षी केस गळतीला सामोरे जावे लागते. शरीरात पोषक तत्वांच्या (nutrition)कमतरतेमुळे असे घडते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनात, प्रत्येकजण त्या व्यक्तीला अशा पदार्थांचे सेवन करता येत नाही ज्यामध्ये महत्त्वपूर्ण पोषक असतात. आणि त्यामुळेच केस गळती सुरू होते. कोणत्या महत्वाच्या व्हिटॅमिनमुळे (vitamin deficiency) केसगळतीचा त्रास होतो ते जाणून घेऊया.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे केस गळतात

येथे आपण व्हिटॅमिन डी 3 बद्दल बोलत आहोत, त्याच्या कमतरतेमुळे केसांसह हाडांचेही नुकसान होते. डॉक्टर असा सल्ला देतात की जर व्हिटॅमिन डी 3 ची शरीरातील पातळी कमी झाली तर अशा परिस्थितीत त्याचे शॉट्स म्हणजेच इंजेक्शन घ्यावे लागू शकते. व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे, दीर्घकाळापर्यंत थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे, नैराश्य आणि वारंवार आजारी पडणे यासारखी लक्षणे दिसतात.

तसेच व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे तणावाची पातळी वाढते आणि डोक्यावरून केस झपाट्याने गळू लागतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरो-संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असू शकतो, असे डॉक्टर स्पष्ट करतात. यासोबतच व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि तो वारंवार संसर्गाचा बळी होऊन आजारी पडू शकतो.

शरीरात कशामुळे निर्माण होते व्हिटॅमिन D3ची कमतरता ?

पुरेसा सूर्यप्रकाश न घेणे आणि अन्नाशी संबंधित चुका यामुळे शरीरात D3 या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होऊ लागते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीने 6 महिन्यातून एकदा तरी व्हिटॅमिन डी चाचणी केली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, शरीरात व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता असल्यास ती केवळ औषधे किंवा इंजेक्शनद्वारे भरून काढता येते. रोज उन्हात बसल्याने फारसा फरक पडत नाही

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.