Immunity Booster : इम्युनिटी वाढवायचीय, तर मग खा ही फळे आणि भाज्या

| Updated on: May 13, 2021 | 9:21 AM

इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता. ही फळे आणि भाज्या तुमची इम्युनिटी मजबूत करू शकतील. (If you want to increase immunity, then eat fruits and vegetables)

Immunity Booster : इम्युनिटी वाढवायचीय, तर मग खा ही फळे आणि भाज्या
इम्युनिटी वाढवायचीय, तर मग खा ही फळे आणि भाज्या
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग सध्याच्या घडीला मोठी चिंता आहे. विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी जो तो पुरेपूर काळजी घेतोय. अगदी मास्क लावण्यापासून ते वेळोवेळी हात धुण्यापर्यंत याचवेळी सकस आहार घेण्याचीही तितकीच गरज आहे. मग हा आहार काय? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. अशा लोकांनी इतर आहाराच्या प्रश्नात अडकून न राहता फळे-भाज्या खाण्यावर अधिक भर द्यावा. इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता. ही फळे आणि भाज्या तुमची इम्युनिटी मजबूत करू शकतील. परिणामी, तुमच्यामध्ये कोरोनासारख्या गंभीर विषाणूंचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होईल. (If you want to increase immunity, then eat fruits and vegetables)

पालक

आपल्याला अनेकदा डॉक्टरांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो. या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, गुणकारी असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, सी, ई, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर, प्रोटीन आणि फायबर यांसारखी पोषक तत्त्वे असतात. ही पोषक तत्त्वे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मोठी मदत करतात. विविध प्रकारे तुम्ही पालकचे सेवन करू शकतात. तुमच्या आवडीनुसार पालकचा ज्यूस, भाजी, सलाड किंवा सूप बनवता येईल.

ब्रोकली

ब्रोकली ही अत्यंत स्वादिष्ठ भाजी आहे. हा कोबीचाच एक भाग आहे. यात अनेक प्रकारची पोषकतत्त्वे असतात. यामध्ये फोलिक अ‍ॅसिड कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम यांचा समावेश आहे. ब्रोकलीचे विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. तुम्ही सलाड, सूप किंवा कढी करून ब्रोकलीचा आहारात वापर करता येईल. ब्रोकलीतील फायटोकोमिक्लस आणि अ‍ँटीऑक्सिडेंटमुळे विविध व्याधी आणि विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी ताकद येते.

मशरूम

मशरुमचे बरेच औषधी गुण आहेत. मशरुम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात अमिनो अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन डी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते. कढी, सूप आणि सलाडच्या रुपात तुम्ही तुमच्या आहारात मशरुमचा वापर करू शकता.

खोबरेल तेल

भाजी बनवण्यासाठी विविध प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. तशाच प्रकारे जेवण बनवण्यासाठी खोबरेल तेलचाही वापर केला जाऊ शकतो. या तेलामध्ये मिनरल्स असतात. याची आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी अर्थात आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मोठी मदत होते.

पुदिना

गरमीच्या दिवसांत पुदिनाचे सेवन केल्यास शरिर थंड राहते. यात व्हिटॅनिम सी, फॉस्फोरस आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्त्वे असतात. तसेच मेंथॉल, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मँगनीज, व्हिटॅमिन ए, रिबोफ्लेविन, आयरन, वसा आणि कॉपर यांसारख्या पोषक तत्त्वांचीही उपलब्धता असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे असलेल्या पुदिनाचा जेवणात समावेश केल्यास आपली इम्युनिटी नक्कीच वाढू शकते. (If you want to increase immunity, then eat fruits and vegetables)

इतर बातम्या

ढगफुटी होते तेव्हा नेमके काय होते? जाणून घ्या क्षणात कसा येतो प्रलय

तोंडाचं ऑपरेशननंतर महिलेला धक्का, स्वतःची बोलण्याची पद्धत विसरुन दुसरीच सुरु, योगायोग नाही तर या आजाराने ग्रस्त