Immunity Booster Drinks | कोरोना काळात या ‘5’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती!

| Updated on: Apr 24, 2021 | 7:17 AM

केवळ चव नसलेल्या गोष्टींनीच आपण रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, असे नाही. याकरता तुम्ही स्वादिष्ट पेय देखील सेवन करू शकता.

Immunity Booster Drinks | कोरोना काळात या ‘5’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती!
पुदीना ताक
Follow us on

मुंबई : कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे, आपण नेहमी निरोगी राहाल आणि कोरोनाला पराभूत करण्यासही सक्षम असाल. म्हणून अशा कठीण काळात स्वत:ची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी अधिकाधिक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न आणि पेय सेवन केले पाहिजे. केवळ चव नसलेल्या गोष्टींनीच आपण रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, असे नाही. याकरता तुम्ही स्वादिष्ट पेय देखील सेवन करू शकता. हे आपल्याला निरोगी राहण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतील. चला तर, जाणून घेऊया अशी कोणती पेय आहेत, जी आपल्याला उन्हाळ्यात हायड्रेटेड आणि तंदुरुस्त ठेवतील…(Immunity Booster Drinks try these drink during corona pandemic)

पुदीना ताक

उन्हाळ्यात ताक आणि लस्सीचे विशेष सेवन केले जाते. हे पेय उन्हाळ्यात आपल्या शरीरास थंड ठेवण्याचे काम करते. यामुळे पाचक प्रणाली ठीक राहते. याशिवाय पुदीना युक्त टाक शरीर हायड्रेटेड ठेवते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. ताकात नेहमी पुदीना आणि जिरे पूड घालावी. याने केवळ चवच वाढत नाही, तर पौष्टिक घटक देखील त्यात सामील होतात. पुदीन्यामध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटामिन सी, ई, ए भरपूर प्रमाणात असते, तर जिऱ्यामध्ये व्हिटामिन सी असते. हे दोन्ही घटक आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य करतात.

वाळ्याचे सरबत

वाळ्याचे सरबत गरम उन्हाळ्यात शरीराला शीतलता देते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. हे सरबत बनवणे खूप सोपे आहे. पाणी, वाळ्याचा इसेन्स (खस पल्प), साखर आणि हिरवा रंग एकत्र करून हे सरबत बनवले जाते. यात लोह, मँगनीज आणि व्हिटामिन बी 6, अँटीऑक्सिडंट्स यासारखे पुष्कळ पोषक घटक असतात. हे सरबत अनेक प्रकारचे रोग दूर ठेवण्यास मदत करते.

आंब्याचे पन्हे

आंबा हे उन्हाळ्यातील सर्वात आवडता फळ आहे. त्याचबरोबर कच्च्या कैरीपासून बनवलेले आंब्याचे पन्हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे पन्हे कैरी, जिरेपूड आणि मिठ यापासून तयार केले जाते. यामुळे डिहायड्रेशन आणि अतिसाराची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते (Immunity Booster Drinks try these drink during corona pandemic).

बेलाचे सरबत

बेल हे उन्हाळ्यातील फळ आहे. हे संपूर्ण भारतात पिकवले जाते. आपण उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक पौष्टिक पूरक आहार घेऊ इच्छित असल्यास, बेलाच्या सरबताचे सेवन करू शकता. यामुळे उन्हाळ्यातही शरीर हायड्रेटेड राहते. त्यात फायबर, व्हिटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे आपले पोट देखील आतून थंड राहते. हे शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्याचे काम करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

हिरव्या भाज्यांचा रस

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण पालक, काकडी आणि आवळ्याचा रस वापरू शकता. पालक आणि आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी आणि बीटा कॅरोटीन असतात. यामुळे संक्रमणाशी लढण्याची क्षमता वाढते. काकडी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. तर, या ज्यूसची चव वाढवण्यासाठी आपण त्यात लिंबाचा रस देखील घालू शकता.

(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Immunity Booster Drinks try these drink during corona pandemic)

हेही वाचा :

हेही वाचा :

महामारीच्या काळात ऑक्सिजन वाढविण्यात मदत करेल ‘किवी’, अशा प्रकारे करा सेवन

पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !