AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महामारीच्या काळात ऑक्सिजन वाढविण्यात मदत करेल ‘किवी’, अशा प्रकारे करा सेवन

किवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या काळात किवीचे सेवन केल्याने शरीर थंड राहते.

महामारीच्या काळात ऑक्सिजन वाढविण्यात मदत करेल 'किवी', अशा प्रकारे करा सेवन
किवी
| Updated on: Apr 22, 2021 | 1:35 PM
Share

मुंबई : किवी हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या काळात किवीचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. किवीमध्ये बरेच पौष्टिक घटक आहेत जे आपले वजन कमी करण्यास आणि पाचक प्रणाली योग्य ठेवण्यास मदत करतात. किवी खाण्याने नेमके आपल्याला कोणते फायदे होतात आणि किवीतून नेमके कुढले पोषक घटक मिळतात हे आज आपण बघणार आहोत. (Kiwi is beneficial in increasing oxygen in the body)

किवी फळामधील पोषक घटक : 

किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. हे आरडीएबरोबरच पोषकद्रव्ये पुरवते. 100 ग्रॅम किवी फळामध्ये किती पोषक घटक असतात हे आपण बघणार आहोत.

1. कॅलरी – 61

2. चरबी – 0.5

3. सोडियम – 3 मिलीग्राम

4. कार्बोहायड्रेट – 15 ग्रॅम

5. साखर – 9 ग्रॅम

6. फायबर – 3 ग्रॅम

7. प्रथिने – 1.1 ग्रॅम

वजन कमी करण्यासाठी किवी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय किवीच्या रसात अँटीऑक्सिडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात.

निरोगी पाचक प्रणालीसाठी किवीचा रस पाचन तंत्रासाठी चांगला असतो. हे पोटा संबंधित समस्या दूर करते. हे पोटात बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते.

त्वचेसाठी फायदेशीर किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.

अनेक रोगांसाठी 

किवी खाल्ल्याने संधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.

संबंधित बातम्या :

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

(Kiwi is beneficial in increasing oxygen in the body)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा