ओ, अहो, ऐकता का … भारतातल्या विविध राज्यात पतीला काय म्हणतात ? नावं ऐकून व्हाल दंग

भारत हा विविधतेत एकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे प्रत्येक किलोमीटरवर बोली बदलते. पतीला 'नवरा' किंवा 'स्वामी' म्हणण्यापासून 'बलमुआ', 'सइयां' पर्यंत अनेक प्रेमळ हाका आहेत. ही प्रादेशिक नावे केवळ शब्दांची विविधता दाखवत नाहीत, तर प्रत्येक भाषेतील प्रेम आणि आदराची अनोखी पद्धतही दर्शवतात. ही भाषिक विविधताच आपल्या देशाची खरी ओळख आहे.

ओ, अहो, ऐकता का ... भारतातल्या विविध राज्यात पतीला काय म्हणतात ? नावं ऐकून व्हाल दंग
देशातील विविध राज्यात पतीला काय म्हणतात ?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 23, 2026 | 2:38 PM

विविधतेत एकता.. हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर बोली, भाषा, लहेजा, बोलण्याची पद्धत बदलत असते. एकच भाषा नव्हे तर मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, हरियाणवी, राजस्थानी, अशा अनेक भाषा आपल्याला या देशात ऐकायला मिळतात. त्यातही काही शब्द, त्यांचे उच्चर वेगळे सतात, मात्र एवढा फरक असूनही सगळे, प्रेमाने, आपुलकीने बोलतात,वागतात हेच या देशाचे सामर्थ्य आहे. एकाच शब्दाची विविध रुपही इथे आपल्या कानी पडतात.

आता पती किंवा नवरा हाच शब्द घ्या ना.. काही ठिकाणी अहो म्हणतात, तर काही ठिकाणी सैंया हाक मारतात. तर दुसऱ्या गावी , राज्यात त्यांना बलमुआ, बींद असंही म्हटलं जातं. म्हणजेच शब्द एक, अर्थही एक, पण त्याला नावं वेगवेगळी. प्रत्येक राज्यात आणि भाषेत प्रेमाची वेगळी बोली असू शकते, अनोखाी पद्धत असते, पण भाव तोच असतो. भारतातल्या कोणत्या राज्यात पतीला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का ? चला जाणून घेऊया.

कोणत्या राज्यात काय म्हणताता पतीला ? नावं ऐकून व्हाल दंग

1. उत्तर प्रदेशात, पतीला “बलमुआ” म्हणतात. हा शब्द प्रेमाची भावना जागृत करतो. तो गोड आणि जवळचा, आपलासा वाटणार आहे.

2. बिहारमध्ये पतीला “सइयां” म्हणतात. हा शब्द प्रेम आणि आपुलकी दोन्ही दर्शवतो. भोजपुरी गाण्यांमध्येही “सइयां” हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो.

3. राजस्थानमध्ये पतीला बिंद म्हणतात. याचा अर्थ जीवनसाथी.

4. हरियाणामध्ये पतीला भरतार म्हणतात.

5. महाराष्ट्रात पतीला नवरा असं म्हणतात.

6. पंजाबमध्ये पतीला ‘खासम’ म्हणतात.

7. हिमाचल प्रदेशात पतीला ‘पौणे’ म्हणतात.

8. छत्तीसगडमध्ये पतीला प्रेमाने “डउका” म्हटले जाते.

9. पश्चिम बंगालमध्ये पतीला “स्वामी” म्हटले जाते. हा शब्द मोठ्या आदराने वापरला जातो.

10. उत्तराखंडमध्ये पतीला ‘बैग’ म्हणतात.

11. बिहारप्रमाणेच जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील पतीला ‘सइयां’ असं म्हणतात.

12. ओडिशामध्ये पतीला भर्ता म्हणतात.

13 . झारखंडमध्ये पतीला फक्त पती असंच म्हटलं जातं.