Flipkart वर जबरदस्त डील; iPhone 15 पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय iPhone 16

नवीन iPhone हवाय, पण पुरेसा नाही? मग ही बातमी तुमच्यासाठीच! iPhone 16 वर फ्लिपकार्ट देत आहे असा काही डिस्काउंट, की तो iPhone 15 पेक्षाही स्वस्त पडतोय! काय आहे ही 'कमाल' डील आणि कशी कराल मोठी बचत? चला, पाहूया!

Flipkart वर जबरदस्त डील; iPhone 15 पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय iPhone 16
Flipkart वर धमाका! iPhone 16 मिळतोय iPhone 15 पेक्षाही स्वस्तात
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 5:21 PM

Apple चा स्मार्टफोन घेण्याची इच्छा अनेकांना असते, पण किंमत पाहून बहुतांश वेळा खिशाकडे बघावं लागतं. मात्र आता iPhone खरेदी करण्याचं स्वप्न साकार होण्याची संधी आहे. Flipkart वर सध्या iPhone 16 वर एक जबरदस्त डील सुरू आहे, ज्यामुळे तुम्ही हा लेटेस्ट iPhone खरेदी करू शकता तोही iPhone 15 पेक्षा कमी किमतीत!

Apple लवकरच iPhone 17 सादर करणार असल्याने सध्या iPhone 16 वर बऱ्यापैकी सवलती दिल्या जात आहेत. हे ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहेत, त्यामुळे इच्छुकांनी ही संधी गमावू नये.

Flipkart वर काय आहे डील?

Flipkart वर iPhone 16 सध्या फक्त ₹69,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन लॉन्चच्या वेळी जवळपास ₹80,000 च्या आसपास होता, म्हणजेच ग्राहकांना थेट ₹10,000 पर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट मिळतोय. याव्यतिरिक्त, काही निवडक बँक कार्ड्सवर ₹2,000 चा अधिकचा डिस्काउंट आणि ₹1,000 चं वेगळं डिस्काउंट कुपनही मिळत आहे.

सर्व ऑफर्स मिळवून तुम्ही iPhone 16 केवळ ₹66,999 मध्ये खरेदी करू शकता, जे iPhone 15 च्या सध्याच्या किंमतीपेक्षा खूपच कमी आहे.

iPhone 16 चे वैशिष्ट्ये काय?

iPhone 16 मध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे जो HDR आणि True Tone सपोर्टसह येतो. यामध्ये Apple चा अत्याधुनिक A18 चिपसेट असून iOS 18 वर चालतो. रॅम 8GB पर्यंत असून स्टोरेज 128GB पासून सुरू होते.

फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून दोन्ही कॅमेरे 12MP चे आहेत. सेल्फीसाठीही 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. iPhone 16 मध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दमदार बॅटरी आहे, जी दिवसभराचा बॅकअप देते.

का घ्यावा हा डील?

  • 1. iPhone 16 वर ₹10,000 चा फ्लॅट डिस्काउंट
  • 2. बँक ऑफरने ₹2,000 ची सूट
  • 3. कूपन डिस्काउंट ₹1,000
  • 4. जुना फोन एक्सचेंज केल्यास ₹14,500 पर्यंत बचत
  • 5. सर्व मिळून iPhone 16 फक्त ₹50,000 च्या आसपास मिळू शकतो.