
सकाळी उठल्यावर अनेकांना केळं खाण्याची सवय असते. समोर ठेवलेलं केळं पाहून आपसूक हात जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रिकाम्या पोटी केळं खाणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे की नुकसानदायक? काहीजण केळ्याला ‘सुपरफूड’ मानतात, तर काहीजण सांगतात की ते गॅस, अॅसिडिटी आणि ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतं. अशा वेळी नेमकं काय योग्य, हे जाणून घेणं गरजेचं ठरतं.
केळं हे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि व्हिटॅमिन B6 ने भरलेलं फळ आहे. ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी उत्तम स्त्रोत मानलं जातं, विशेषतः सकाळी जेव्हा शरीराला उर्जेची अधिक गरज असते. त्यामुळे केळं हे सहजपणे खाल्लं जातं. मात्र, जेव्हा तुम्ही ते रिकाम्या पोटी खातात, तेव्हा काही जणांना गॅस, सूज किंवा अॅसिडिटीचा त्रास जाणवतो.
त्वरित उर्जेची गरज असताना: केळ्यात नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज) असते, जी पटकन ऊर्जा देते. त्यामुळे वर्कआउटपूर्वी किंवा धावपळीच्या दिवशी याचा उपयोग होतो.
पचनशक्ती चांगली असल्यास: ज्यांची पचनशक्ती मजबूत आहे, त्यांनी खाली पोटात केळं खाल्ल्यास काही धोका नसतो. उलट ते उपयुक्त ठरतं.
इतर पदार्थांसोबत केळं खाणं: केळं दही, ओट्स, बदाम किंवा पीनट बटरसोबत खाल्ल्यास ते अधिक संतुलित आणि पचनास हलकं होतं.
1. अॅसिडिटी किंवा गॅस
अशा अवस्थेत रिकाम्या पोटी केळं खाल्ल्यास पोटातील अॅसिड वाढू शकतं, त्यामुळे गॅस, सूज किंवा जळजळ होऊ शकते.
2. डायबेटीस
केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. डायबेटिस असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी केळं टाळावं.
3. सकाळी फक्त केळ
जर दिवसाची सुरुवात केवळ केळ्याने केली आणि बराच वेळ काही खाल्लं नाही, तर शरीराला आवश्यक प्रथिने, चरबी आणि इतर पोषणद्रव्य मिळत नाहीत, जे दीर्घकाळ आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.
योग्य मार्ग असा आहे की जर तुम्हाला केळं खाण्याची सवय किंवा आवड असेल, तर ते सकाळी रिकाम्या पोटी फक्त एकटं खाणं टाळावं. त्याऐवजी केळ्याबरोबर काही पोषणमूल्यांनी समृद्ध पदार्थ खाणं जास्त उपयुक्त ठरतं. उदाहरणार्थ, केळं दही, ओट्स, बदाम, किंवा पीनट बटरसोबत खाल्ल्यास ते केवळ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवत नाही, तर पचनक्रियेसाठीही फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे केळ्याचा आरोग्यावर होणारा तात्काळ परिणाम कमी होतो आणि दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही केळं सकाळी खाण्याचा विचार करत असाल, तर त्यासोबत योग्य अन्न संयोजन असणं आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)