AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना मिठाची पिशवी सोबत का ठेवावी? 90 टक्के लोकांना माहित नसेल

पावसाळ्यात ट्रेकिंग करताना मिठाची पिशवी नेहमी सोबत ठेवणे आवश्यक का मानले जाते. त्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. शिवाय मिठाची पिशवी जवळ बाळगल्याने बऱ्याच धोक्यांपासून संरक्षण होते. कसं? चला जाणून घेऊयात.

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना मिठाची पिशवी सोबत का ठेवावी? 90 टक्के लोकांना माहित नसेल
monsoon trekking saltImage Credit source: Meta AI
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 15, 2025 | 6:39 PM
Share

पावसाळा सुरू होताच, देशभरातील अनेक निसर्गप्रेमींसाठी ट्रेकिंग ही एक लोकप्रिय गोष्ट आहे. तथापि, पावसाळ्यात ट्रेकिंग करणं म्हणजे एक थ्रील आणि वातावरणाचा आनंद लुटणे. पण इतरवेळेपेक्षा पावसाळ्यात ट्रेकिंग करताना बरीच आव्हानेही समोर असतात. त्यामुळे सगळ्याबाजूने काळजी घ्यावी लागते. विशेषतः डोंगराळ आणि जंगली प्रदेशात कीटक आणि त्वचेशी संबंधित समस्यांना तर खूपच सामोरं जावं लागतं.

ट्रेकिंगला जाताना मीठ सोबत बाळगण्याचा सल्ला का दिला जातो?

त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही सामान आपल्या बरोबर असणेही गरजेचे असते. त्यातीलच एक म्हणजे मीठ. होय. तुम्ही पावसाळ्यात किंवा इतर वेळीही ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर सोबत मिठाची छोटी पिशवी का असेना पण नक्की सोबत ठेवा. तज्ज्ञ आणि अनुभवी ट्रेकर्स पावसाळी ट्रेकिंगसाठी नेहमी मीठ सोबत बाळगण्याचा सल्ला देतात. पण का चला जाणून घेऊयात.

पावसाळ्यात, पर्वतीय पायवाटा आणि जंगलातील रस्ते बहुतेकदा विविध प्रकारचे कीटक आणि जळू यांचे घर असतात, ज्यापैकी काही कीटकांमुळे अस्वस्थता किंवा त्वचेचे संक्रमण देखील होऊ शकते. मीठ हे एक प्रभावी नैसर्गिक प्रतिकारक म्हणून काम करते.

ट्रेकिंगला जाताना मिठाची पिशवी सोबत ठेवण्याचे फायदे:

जळू आणि किटकांचा प्रतिबंध: ट्रेकिंग करताना जळू किंवा इतर किटकांचा त्रास होण्याची शक्यता असते. मिठाचा उपयोग जळू किंवा किटकांना दूर ठेवण्यासाठी किंवा चावल्यास आराम मिळवण्यासाठी होतो. किटकांवर मीठ टाकले तर ते लगेच त्वचेपासून वेगळे होतात त्यामुळे चावण्याचा आणि कोणतेही संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.

क्षारांची कमतरता भरून काढणे: जास्त घाम आल्यास शरीरातील क्षार कमी होतात. मिठाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षार यांचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते असं म्हटलं जातं.

नैसर्गिक प्रतिकारशक्ती: मीठ नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेला होणाऱ्या संसर्गांपासून वाचवते.

इतर उपयुक्त गोष्टी: ट्रेकिंगसाठी जाताना पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी, फर्स्ट-एड किट, नकाशा, दिशादर्शक (compass), बॅटरी टॉर्च, इत्यादी गोष्टी देखील नेहमी सोबत ठेवाव्यात.तसेच हलके आणि ऊर्जा देणारे खाद्यपदार्थ जसे की सुका मेवा, चिक्की, फळे बॅकेत ठेवावेत. शक्य असल्यास, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाळून कापडी पिशव्या किंवा कंटेनर वापरता आले तर उत्तम.

महत्त्वाची टीप: तसेच कोणत्याही ट्रेकिंगला जातान तिथल्या ठिकाणांची माहिती काढून अन् योग्य ते मार्गदर्शन घेऊन मगच जावे. अन्यथा पुढे जाऊन कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी