AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावर तेज येतं, वजन घटतं… रोज सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे कित्येक फायदे!

आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते.

चेहऱ्यावर तेज येतं, वजन घटतं... रोज सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे कित्येक फायदे!
पाणी पिणे फायदेशीर
| Updated on: May 24, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. पाणी पिल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव होतो. (It is beneficial to drink water on an empty stomach every morning)

रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल. अनेकांना बद्धकोष्ठता सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, पाणी पिणं हा त्यावरील चांगला उपाय आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. जर तुम्ही शरीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या.

यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी होते. तसेच त्वचेची समस्याही कमी होते. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते. नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे. शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर दही, उन्हाळ्यात अशा प्रकारे करा उपयोग

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(It is beneficial to drink water on an empty stomach every morning)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.