AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Matcha Tea | ‘ग्रीन टी’ पिऊन कंटाळलात, तर वजन कमी करण्यासाठी ट्राय करा ‘माचा टी’!

माचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे. त्याच्या अनेक फायद्यांमुळे जपानमधील लोक या चहाला 'सुपरफूड' देखील म्हणतात.

Matcha Tea | 'ग्रीन टी' पिऊन कंटाळलात, तर वजन कमी करण्यासाठी ट्राय करा 'माचा टी'!
माचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे.
| Updated on: Jan 29, 2021 | 4:51 PM
Share

मुंबई : आरोग्याच्या बाबतीत आपण ‘ग्रीन टी’च्या फायद्यांबद्दल बऱ्याचदा ऐकले असेल किंवा वाचलेही असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला ग्रीन टीचाच एक प्रकार असणाऱ्या ‘माचा टी’बद्दल सांगणार आहोत. माचा टी हा जपानमधील पारंपारिक चहा आहे. त्याच्या अनेक फायद्यांमुळे जपानमधील लोक या चहाला ‘सुपरफूड’ देखील म्हणतात. असे म्हटले जाते की माचा टीचा एक कप ग्रीन टीच्या दहा कपाच्या बरोबरीचा असतो. जर आपल्याला ग्रीन टी पिऊन कंटाळा आला असेल, तर या वेळी आपण माचा टी ट्राय करू शकता. यासह आपल्याला एक नवीन स्वाद मिळेल आणि आरोग्यामध्येही सुधारणा होईल. चला तर, त्याचे फायदे जाणून घेऊया…(Japanese matcha tea benefits for weight loss)

‘माचा टी’चे फायदे :

– माचा टी हा चहाच्या हिरव्या कोरड्या पानांपासून बनवला जातो, म्हणून त्याचा रंगही हिरवा असतो. हा चहा तयार होण्यास बराच वेळ लागतो, परंतु बाजारात ते पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे. आरोग्याच्या बाबतीत हा चहा खूप फायदेशीर मानला जातो.

– हा चहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. एका संशोधनात असेही समोर आले आहे की, जर 12 आठवड्यांपर्यंत सतत हा चहा सेवन केला, तर शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच कंबरेचे आकार आणि शरीराचे वजन देखील कमी होते.

– अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध ‘माचा चहा’ गंभीर आजारांपासून आपला बचाव करतो. याच्या सेवनाने कर्करोगाने आणि हृदयरोगासारख्या आजाराचा धोका कमी होत असल्याचे देखील मानले जाते. तज्ज्ञ देखील औषध म्हणून हा चहा घेण्याची शिफारस करतात (Japanese matcha tea benefits for weight loss).

– त्यातील पॉलिफेनॉल नावाचा अँटी-ऑक्सिडंट शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवतो. त्याच्या वारंवार वापरामुळे, चेहऱ्यावर मुरुम येत नाही आणि सेवन करणारी व्यक्ती बर्‍याच काळासाठी तरुण दिसते.

– काही काळापूर्वी, जपानच्या कुमामोटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काही उंदरांवर माचा चहाची चाचणी केली. यावेळी त्यांना आढळले की, ज्या उंदरांनी माचा पावडर किंवा माचा अर्क सेवन केला होता, त्यांच्या चिंताग्रस्त वागण्यात लक्षणीय घट झाली होती. संशोधकांच्या मते, माचा टीमध्ये असे काही घटक असतात, जे डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन रिसेप्टर्स सक्रिय करतात. ज्यामुळे एखाद्याचा तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.

– माचा चहामध्ये फायबर, क्लोरोफिल, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम आणि व्हिटामिन सी बरोबरच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Japanese matcha tea benefits for weight loss)

हेही वाचा :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.