नववधूच्या हँडबॅगमध्ये ठेवायला विसरू नका या वस्तू, आताच सेव्ह करा ही चेकलिस्ट

Bride Handbag Essential Items: लग्नानंतर नव्या घरात जाताना नववधूने स्वतःच्या हँडबॅगमध्ये काही आवश्यक वस्तू ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्या गोष्टी बॅगेत असाव्यात, याची ही खास चेकलिस्ट आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी ही यादी आताच सेव्ह करा.

नववधूच्या हँडबॅगमध्ये ठेवायला विसरू नका या वस्तू, आताच सेव्ह करा ही चेकलिस्ट
| Edited By: | Updated on: Nov 20, 2026 | 1:09 PM

लग्नानंतर नव्या घरात, नव्या माणसांमध्ये आणि वेगळ्या वातावरणात वावरताना नववधूला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लग्नानंतर काही दिवस सतत पाहुण्यांची ये-जा, वेगवेगळे समारंभ, नातेवाईकांच्या भेटी आणि बाहेर जाण्याचे प्रसंग सुरू असतात. अशा वेळी एखादी छोटीशी गरजेची वस्तू जवळ नसल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे नववधूने आपल्या हँडबॅगमध्ये रोजच्या वापरातील काही आवश्यक वस्तू आधीच न विसरता ठेवाव्यात. या वस्तू ऐनवेळी खूप उपयोगी पडू शकतात. पाहूया, नववधूच्या हँडबॅगमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात.

लिप बाम आणि कॉम्पॅक्ट पावडर

Loading...

सतत मेकअप केल्यामुळे किंवा बराच वेळ बाहेर राहिल्यामुळे ओठ कोरडे पडू शकतात आणि चेहरा थकलेला दिसू शकतो. अशा वेळी लिप बाम आणि छोटा कॉम्पॅक्ट उपयोगी पडतो. यामुळे चेहरा फ्रेश दिसण्यास मदत होईल.

परफ्यूम

दिवसभर धावपळ आणि पाहुण्यांच्या भेटीगाठींमुळे घाम येऊ शकतो. त्यामुळे हँडबॅगमध्ये छोट्या आकाराची परफ्यूमची बाटली ठेवा. सौम्य सुगंधाचा परफ्यूम वापरल्याने फ्रेश वाटेल.

सेफ्टी पिन आणि हेअर पिन

साडी, ड्रेस किंवा लेहेंगा नेसताना पदर निसटणे किंवा कपड्यांची घडी विस्कटणे असे प्रकार होऊ शकतात. अशा वेळी सेफ्टी पिन उपयोगी पडतात. हेअर पिन जवळ असल्यास केसांची स्टाइलही लगेच व्यवस्थित करता येते.

टिश्यू पेपर आणि वेट वाइप्स

घाम पुसण्यासाठी, हात स्वच्छ करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील मेकअप ठीक करण्यासाठी टिश्यू पेपर आणि वेट वाइप्स उपयोगी पडतात. बाहेर पाण्याची सोय नसतानाही त्यांचा वापर करता येतो.

सॅनिटरी पॅड आणि अतिरिक्त हेअर क्लिप

मासिक पाळी कधी सुरू होईल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे हँडबॅगमध्ये एक-दोन सॅनिटरी पॅड ठेवा. यासोबत अतिरिक्त हेअर क्लिप आणि रबर बँडही जवळ ठेवल्यास केसांची स्टाइल बिघडल्यावर ते उपयोगी पडतील.

थोडे रोख पैसे आणि कार्ड

प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट शक्य नसते. रिक्षाचे भाडे किंवा अचानक करावी लागणारी छोटी खरेदी यासाठी थोडे सुटे पैसे जवळ ठेवा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डही हँडबॅगमध्ये ठेवू शकता.

आवश्यक औषधे आणि बँडेज

डोकेदुखी, गॅस किंवा मळमळ यांसारख्या त्रासांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरत असलेली औषधे जवळ ठेवा. नवीन चप्पल किंवा सँडलमुळे पायाला फोड आल्यास उपयोगी पडण्यासाठी एक-दोन बँडेजही ठेवा.

फोन चार्जर आणि पॉवर बँक

प्रवास, फोटो काढणे आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी फोनची गरज असते. सतत वापरामुळे बॅटरी संपण्याची शक्यता असल्याने हँडबॅगमध्ये चार्जिंग केबल आणि छोटी पॉवर बँक ठेवा. त्यामुळे बाहेर असताना फोन बंद पडण्याची चिंता राहणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us