Weight Loss : झोपेमुळे लठ्ठपणा कमी होतो, कसे ते जाणून घ्या!

| Updated on: Jul 06, 2021 | 1:30 PM

आपल्या सर्वांना हे माहित आहे की निरोगी शरीरासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. मात्र, हे आपल्याला माहीती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत रात्री उशीरापर्यंत जागे राहतो.

Weight Loss : झोपेमुळे लठ्ठपणा कमी होतो, कसे ते जाणून घ्या!
चांगली झोप
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना हे माहित आहे की, निरोगी शरीरासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. मात्र, हे आपल्याला माहीती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत रात्री उशीरापर्यंत जागे राहतो. तसेच सकाळी आॅफिसमुळे आपल्याला लवकर उठावे लागते. झोपेच्या कमतरतेमुळे बॉडी मास इंडेक्स वाढू लागतो. कमी झोपेचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेष म्हणजे कमी झोपेमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. (8-9 hours of sleep is beneficial for weight loss)

झोप कमी मिळाल्यामुळे आपले वजन वाढण्याची देखील शक्यता असते. मात्र, जर आपण व्यवस्थित झोप घेत असाल तर आपले वजन कमी होण्यास देखील मदत मिळते. पुरेशी झोप न घेतल्याने चयापचय आणि हार्मोन्समध्ये बदल होतो. यामुळे, आपल्याला अधिक भूक लागते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. चांगली झोप घेऊन वजन कमी कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चयापचय वाढते

चांगली झोप तुमचे चयापचय वाढवते. ज्या लोकांना पुरेशी झोप लागते आणि जे पुरेशी झोप घेतात. अशा लोकांचे चयापचय अधिक चांगले होते. पुरेशी झोप न घेतल्यामुळे चयापचय अनियमितपणे होते आणि हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप -2 मधुमेहाचा धोका वाढतो. वजन देखील वाढण्यास यामुळे मदत होते.

ताण कमी होतो

पुरेशी झोप घेतल्याने तणाव कमी होतो. पुरेशी झोप न मिळण्याचा परिणाम ताण आणि लठ्ठपणावर दिसून येतो. जास्त ताणामुळे आपण जास्त अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते.

मेडिटेशन

मेडिटेशन करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. रिकाम्या जागी बसून दीर्घ श्वास घ्या. आपले डोळे बंद करा आणि श्वास घ्या. आपण ही प्रक्रिया दररोज 5 ते 20 मिनिटांसाठी करू शकता. हे ताण कमी करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते. मेडिटेशन केल्याने आपल्याला रात्री झोप येते आणि कोणत्याही तणावाशिवाय आपण आराम करू शकता.

चांगली झोप

चांगल्या जीवनशैलीसाठी दिवसाला 7 ते 9 तासांची झोपे घेणे खूप महत्वाचे आहे. 7 ते 9 तासांची झोप घेतल्यामुळे आरोग्याला विविध फायदे होतात. चांगल्या झोपेमुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.

1. कॅफिनचे सेवन कमी करा

2. रात्री झोपताना मोबाईल जवळ घेऊन झोपू नका

3. रात्रीच्या जेवनात फायबरचा समावेश करा

4. स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(8-9 hours of sleep is beneficial for weight loss)