Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत

आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत.

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत
बदाम
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 12:45 PM

मुंबई : आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत. बदाम शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, निरोगी चरबी आणि रक्तातील साखर पातळी योग्य ठेवते. बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण, बदाम सोलून खावेत की न सोलता खायला हवेत, याबद्दल बरेच लोक संभ्रमात असतात (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

जाणून घ्या बदाम खाण्याचा योग्य मार्ग

बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत यावर बऱ्याच लोकांचे दुमत असते. बरेच लोक फक्त घाईघाईत सालासकटच बदाम खातात. यामुळे त्यांना बदामाचा पूर्णपणे लाभही मिळत नाही. बदामाचे साल पचायला खूप जड आहे. बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाइम असतो. यामुळे पोषक घटक शरीरात पूर्णपणे शोषले जात नाहीत. म्हणूनच बदाम नेहमी सोलूनच खाल्ले पाहिजेत.

भिजवलेल्या बदामांचे फायदे

बदाम सालासकट खाणे तसेही थोडे त्रासदायक असते. त्याच वेळी, बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

एका दिवसात किती बदाम खावेत?

  1. रात्री 3 ते 4 बदाम भिजवा. सकाळी ही बदाम सोलून तुम्ही खाऊ शकता. हे बदाम आपल्याला त्वरित ऊर्जा देतील, जी सकाळी अधिक महत्वाची आहे.
  2. सकाळचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी आपण ओट्स, स्मूदी आणि शेकमध्ये बदाम वापरू शकता.
  3. न्याहरीसाठी आपण बदाम मनुका, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया भिजवून खाऊ शकता.
  4. बर्फी, लाडू, कुकीज, ग्रॅनोला बार आणि क्लासिक हलवा यासारख्या घरी बनवलेल्या मिठाईंमध्येही बदामांचा वापर केला जाऊ शकतो.
  5. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.
  6. आपण दररोज 3 ते 4 बदामाचे सहज सेवन करू शकता.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit)

हेही वाचा :

Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!

Home Remedies | ‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय? मग, ‘या’ सोप्या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.