Health Care : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस-हळदीचा काढा प्या!

देशभरामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची भिती कायम आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामध्येही पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांची भिती अधिक असते. यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Health Care : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस-हळदीचा काढा प्या!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 8:01 AM

मुंबई : देशभरामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची भिती कायम आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामध्येही पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांची भिती अधिक असते. यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करावा आणि या हंगामात बाहेरचे अन्न टाळावे. (Basil and turmeric extract is beneficial for boosting the immune system)

जरी अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती हंगामी रोगांशी लढण्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु फार कमी लोक त्यांचा वापर करतात. हंगामी रोगांशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी मिश्रण म्हणजे तुळस आणि हळद यांचे मिश्रण आहे. हे पेय रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते.

1. काढा तयार करण्यासाठी साहित्य-

अर्धा चमचा हळद

8-12 तुळशीची पाने

2-3 चमचे मध

3-4 लवंगा

1 दालचिनी

2. पेय कसे बनवायचे?

एक पॅन घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी घाला. आता त्यात हळद, तुळशीची पाने, लवंगा आणि दालचिनी घाला. मिश्रण 15 मिनिटे उकळू द्या. फिल्टर केलेले पाणी वापरण्याची खात्री करा. 15 मिनिटांनी पाणी गाळून घ्या आणि कोमट करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध घालू शकता. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि सर्दी आणि फ्लू बरा करण्यासाठी तुम्ही हा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता.

3. काढा पिण्याचे फायदे-

– मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे पेय घेऊ शकतात.

– हे आपल्या शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास आणि आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.

– या पेयाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि लूज मोशनची समस्याही दूर होऊ शकते.

– या काढामुळे तुम्हाला सर्दी आणि घशातील दुखण्यापासून आराम मिळतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Basil and turmeric extract is beneficial for boosting the immune system)