डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Jun 20, 2021 | 7:38 AM

डोकेदुखी हा एक सामान्य आजार आहे, जो बहुतेक लोकांना त्रासदायक ठरतो. यामागे बरीच कारणे असू शकतात. कधीकधी, तणावग्रस्त आणि निराश झाल्यानंतरही डोक्यात वेदना होतात.

डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
महिलांच्या आरोग्याला घातक टॉक्सिक शॉक सिंड्रोम
Follow us on

मुंबई : डोकेदुखी हा एक सामान्य आजार आहे, जो बहुतेक लोकांना त्रासदायक ठरतो. यामागे बरीच कारणे असू शकतात. तणावग्रस्त आणि निराश झाल्यानंतरही डोक्यात वेदना होतात. बऱ्याच वेळ काही खाल्ले नाहीतरी डोकेदुखीला सुरूवात होते. डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र, आपण काही घरगुती उपाय करूनही डोकेदुखीची समस्या दूर करू शकतो. (Clove is extremely beneficial for relieving headaches)

अनेकदा तणावामुळे खूप डोकं दुखतं. अशावेळेस लवंग खूप उपयुक्त ठरते. लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. 10-15 लवंगांची बारीक पूड करा. ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. वेदना कमी होतात. दोन चमचे खोबरेल तेल, त्यामध्ये एक चमचा मिठ आणि चार-पाच थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं. याने त्वरीत आराम मिळतो.

लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते. एका भांड्यात 2 कप पाणी घाला आणि उकळल्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. सुमारे 15 ते 20 मिनिटे याला उकळी येऊ द्या. त्यानंतर, हा चहा गाळा आणि वर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्या.वजन कमी करण्यासाठी लवंग चहा अत्यंत फायदेशीर आहे.

आपण जर दररोज हा चहा घेतला तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी जर आपण व्यायामाला जात असाल तर हा चहा घ्या यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Clove is extremely beneficial for relieving headaches)