Oats | जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर ओट्सचे या 4 प्रकारे सेवन करा!

Oats | जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर ओट्सचे या 4 प्रकारे सेवन करा!
Image Credit source: Society19.com

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ओट्स खाऊ शकता. शिवाय जर आपल्याला अचानक भूक लागली तरीही तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. स्नॅक्समध्ये ओट्स खाल्ल्याने भूक कमी होते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. ओट्सच्या चिवड्याचाही आहारात समावेश करू शकता, ड्रायफ्रुट्स टाकून स्नॅक्ससाठी ओट्सही तयार करू शकता. यामुळे वजन वाढण्याची अजिबात भिती नसते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 16, 2022 | 11:45 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. आजच्या काळात हे खूप आरोग्यदायी मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक सकाळच्या नाश्त्यात ओट्सचे (Oats) सेवन करतात. ओट्समध्ये भरपूर कार्ब आणि फायबर असतात. ओट्स वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. म्हणजे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात साध्या ओट्सचा समावेश करा. एक कप फ्लेवर्ड ओट्समध्ये एक कप साध्या ओट्सपेक्षा सुमारे 70 कॅलरीज (Calories) जास्त असतात. म्हणूनच साधे ओट्सचे सेवन केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी नेमक्या कशाप्रकारे ओट्सचे सेवन करायला हवे.

स्नॅक्समध्ये ओट्स

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ओट्स खाऊ शकता. शिवाय जर आपल्याला अचानक भूक लागली तरीही तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. स्नॅक्समध्ये ओट्स खाल्ल्याने भूक कमी होते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. ओट्सच्या चिवड्याचाही आहारात समावेश करू शकता, ड्रायफ्रुट्स टाकून स्नॅक्ससाठी ओट्सही तयार करू शकता. यामुळे वजन वाढण्याची अजिबात भिती नसते.

साखर नको

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे साखर खाणे कमी करावे लागते. पण जर तुम्हाला गोड ओट्स खायचे असतील तर तुम्ही त्यात ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा ब्लॅकबेरी टाकून खाऊ शकता. मात्र, ज्यांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी चुकूनही ओट्समध्ये साखर टाकून खाऊ नये. नाहीतर आपले वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

ओट्स आणि पाणी

बहुतेक लोकांना ओट्स दुधात मिसळून खायला आवडतात. पण वजन कमी करायचे असेल तर दुधाऐवजी पाण्याचा वापर करा. हे करण्यासाठी तुम्ही एक कप ओट्स घ्या, त्यात 1 कप पाणी घाला, नंतर ते शिजवा, अशा ओट्सच्या वापरामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

हिरव्या भाज्या

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या खूप जास्त मदत करतात. मग अशावेळी आपण ओट्स तयार करताना जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जाही मिळते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें