रोज सकाळी कडीपत्ता, पुदिना आणि मधाचे खास पेय प्या अन् वजन घटवा

| Updated on: Jun 20, 2021 | 7:40 AM

सध्या कोरोनामुळे घराच्या बाहेर पडणे टाळले जात आहे, जे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मात्र, सतत घरामध्ये बसून वजन वाढत आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात.

रोज सकाळी कडीपत्ता, पुदिना आणि मधाचे खास पेय प्या अन् वजन घटवा
खाय पेय
Follow us on

मुंबई : सध्या कोरोनामुळे घराच्या बाहेर पडणे टाळले जात आहे, जे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मात्र, सतत घरामध्ये बसून वजन वाढत आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामध्ये ही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. त्यामध्येही अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे वजन हे वाढतच चालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आरोग्याची विशेष काळजी घेत आपले वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. (curry leaves and honey are beneficial for weight loss)

आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे बाहेर न जाता आणि व्यायाम न करता देखील आपण आपले वाढलेले वजन कमी करू शकतो. यासाठी कढीपत्ता, पुदिना आणि मध लागणार आहे. सर्वात अगोदर कढीपत्ता आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्या आणि गरम पाण्यात मिक्स करून उकळी येऊद्या. साधारण 25-30 मिनिटे हे पाणी चांगले उकळा. त्यानंतर शेवटी यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. या खास पेयामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.

कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. कढीपत्त्यात औषधी गुणधर्म असतात. दररोज कढीपत्त्याचा समावेश आपल्या आहारात केलातर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. कढीपत्ता आयुर्वेदिक औषधांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे अ, बी, सी, बी 12, लोह आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक असतात. त्यात अँटी बॅक्टेरिया, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स हे देखील आहेत.

ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(curry leaves and honey are beneficial for weight loss)