AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ‘हा’ खास काढा प्या!

या कोरोनाच्या काळात आजारांपासून दूर राहणे आता गरजेचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'हा' खास काढा प्या!
तीळाचे खास पेय
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात आजारांपासून दूर राहणे आता गरजेचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती, कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर अनेक रोग आपल्यापासून दूर राहू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा अत्यंत फायदेशीर असतो. (Drink this ayurvedic extract to lose weight)

विशेष म्हणजे काढयामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच आणि वजन कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास काढा आपण घरी देखील तयार करू शकतो. यासाठी आपल्याला तीन ते चार तुळशीची पाने, पुदिनाची पाने, गुळ, दालचिनी, लवंग, आद्रक आणि लिंबू लागणार आहे. हे सर्व साहित्य तीन ग्लास पाण्यात मिक्स करा आणि साधारण अर्धा तास मंद आचेवर उकळूद्या.

जेंव्हा हा काढा गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार त्यावेळी झाकण झाका. हा काढा गरम असतानाच प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल.

ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात. जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

(Drink this ayurvedic extract to lose weight)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?