Health Care : पालकाचा रस आणि नारळ पाणी मिक्स करून पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे!

| Updated on: Jul 19, 2021 | 9:29 AM

नारळ पाणी आणि पालक हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात.

Health Care : पालकाचा रस आणि नारळ पाणी मिक्स करून पिण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे!
पालकाचा रस
Follow us on

मुंबई : नारळ पाणी आणि पालक हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. (Drinking a mixture of spinach juice and coconut water is beneficial for health)

तर पालक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पालकमध्ये ‘अ’ जीवनसत्व असते. त्यामुळे श्वसनासंबंधिच्या रोगांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते.

मात्र, जर आपल्याला मुतखड्याची समस्या असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पालकाचा रस आणि नारळ पाणी एकत्र मिक्स करून पिले पाहिजेत. पालकाचा रस आणि नारळ पाणी एकत्र करून पिले तर मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. डाॅक्टर अनेक लोकांना कच्चे पालक खाण्याचा सल्ला देतात कारण कच्चे पालक खाण्याने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. कच्छ पालकही खूप गुणकारी आहे.

पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो. नारळाचे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drinking a mixture of spinach juice and coconut water is beneficial for health)