तुम्हाला पनीर बरेच दिवस ताजे ठेवायचे असेल तर ‘या’ टिप्स करा फॉलो

खाण्याच्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या गेल्या नाही तर त्या लवकर खराब होतात. परंतु जेव्हा घरातील जेवण आणि इतर पदार्थ आपण बऱ्याच दिवस ताजे ठेऊ शकतो. तसेच पनीर हे आपल्या आहारात सर्वात जास्त वापरले जाते. तर तुम्हाला सुद्धा पनीर जास्त दिवस ताजे ठेवायचे असेल तर आजच्या या लेखात आपण या ट्रिक्सच्या मदतीने बऱ्याच दिवस ताजे कसे ठेवता येतील ते जाणून घेऊयात...

तुम्हाला पनीर बरेच दिवस ताजे ठेवायचे असेल तर या टिप्स करा फॉलो
तुम्हाला पनीर बरेच दिवस ताजे ठेवायचे असेल तर 'या' टिप्स करा फॉलो
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 4:25 PM

आपल्यापैकी अनेकांना पनीरचे वेगवेगळे पदार्थ खायला खुप आवडतात. तसेच पनीर हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. अशातच पनीर योग्यरित्या ठेवल्यास त्याचा ताजेपणा 7-10 दिवस टिकून राहते. जर त्याची योग्य काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होऊ शकते. ओलावा कमी झाल्यामुळे पनीर कडक होते आणि जर ते जास्त काळ योग्यरित्या ठेवले नाही तर त्यात बुरशी वाढू शकते. तर आजच्या या लेखात तुम्हाला पनीर जास्त दिवस ताजे आणि मऊ ठेवण्याचे काही सोपे आणि प्रभावी ट्रिक्स सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात…

पनीर पाण्यात ठेवा

जर तुम्हाला पनीर जास्त दिवस ताजे ठेवायचे असेल तर ते थंड पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवा. ही पद्धत पनीरमधील ओलावा टिकवून ठेवते आणि पनीर सुकण्यापासून रोखते. त्यात बॅक्टेरिया वाढू नयेत म्हणून दररोज पाणी बदलणे महत्वाचे आहे.

हवाबंद कंटेनरचा वापर करा

जर तुम्हाला पनीर पाण्यात ठेवायचे नसेल तर ते हवाबंद डब्यात ठेवा. पनीर कधीही उघड्या हवेत ठेऊ नका अशाने ते लवकर कोरडे होऊ शकते, ज्यामुळे पनीरची चव आणि पोत खराब होऊ शकते.

पनीर हलक्या ओल्या कापडात गुंडाळा

पनीर ताजे ठेवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे ते हलक्या ओल्या सुती कापडात गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे. यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि पनीर कडक होत नाही.

हलक्या खारट पाण्यात पनीर ठेवा

मीठ एक नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करते. हलक्या मीठाच्या पाण्यात पनीर ठेवल्याने बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि ते जास्त काळ ताजे राहते. जेव्हा तुम्हाला पनीर 5-7 दिवस ठेवायचे असते तेव्हा ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते.

डीप फ्रीज करा

जर तुम्हाला पनीर सुमारे 15 दिवस फ्रेश व सुरक्षित ठेवायचे असेल, तर त्याचे लहान तुकडे करा, हवाबंद पिशवीत पॅक करा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा पनीरचा वापर करायचा असेल तेव्हा ते खोलीच्या तापमानाला आणा आणि गरम पाण्याने धुवा आणि नंतर वापरा.

काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा

प्लास्टिकच्या पिशवीत पनीर ठेवणे हा चांगला मार्ग नाही कारण त्यामुळे हवा व्यवस्थित जाऊ शकत नाही आणि पनीर लवकर खराब होते. त्याऐवजी ते काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात फ्रिजमध्येही ठेऊ शकतात.

योग्य तापमानात पनीर ठेवा

रेफ्रिजरेटरचे योग्य तापमान राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणून पनीर नेहमी 2-5°C दरम्यान ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)