झटपट घरी तयार करा खास ब्रोकोली लेमन राईस, पाहा रेसिपी!

| Updated on: Sep 30, 2021 | 8:01 AM

प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारखी सर्व पोषक घटक ब्रोकोलीमध्ये आढळतात. यात अँटीऑक्सिडेंट, कर्करोग विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. ते अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात

झटपट घरी तयार करा खास ब्रोकोली लेमन राईस, पाहा रेसिपी!
राईस
Follow us on

मुंबई : ब्रोकोली लेमन राईस ही अत्यंत चवदार आणि खास डिश आहे. ही रेसिपी तयार करणे देखील खूप सोप्पी आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी वेळेमध्ये ही खास डिश तयार होते. आपण करी सोबत देखील हा खास राईस आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. (Eating broccoli lemon rice is good for health)

प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारखी सर्व पोषक घटक ब्रोकोलीमध्ये आढळतात. यात अँटीऑक्सिडेंट, कर्करोग विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. ते अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात. जर तुम्हाला काहीतरी निरोगी खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ब्रोकोली लेमन राईस बनवू शकता. त्याची रेसिपी जाणून घेऊया.

-ब्रोकोली लेमन राईससाठी साहित्य

1.तांदूळ – 3 कप

2.ऑलिव्ह तेल – 4 टीस्पून

3.कांदे – 2 चिरलेले

4.सुक्या लाल मिरच्या – 4

5.आवश्यकतेनुसार मीठ

6.ब्रोकोली – 500 ग्रॅम

7.जिरे – 1 टीस्पून

8.लसूण – 8 पाकळ्या

9.ग्राउंड हळद – 1/2 टीस्पून

10.लिंबाचा रस – 1/2 कप

स्टेप – 1
सुमारे 5 मिनिटे प्रेशर कुकरमध्ये तांदूळ शिजवून घ्या. तांदूळ फुगेपर्यंत शिजवा. गॅस बंद करा आणि एका मोठ्या भांड्यात तांदूळ बाहेर काढा आणि बाजूला ठेवा.

स्टेप – 2
दरम्यान, ब्रोकोली पाण्यात धुवून एका लहान भांड्यात कापून घ्या. नंतर कांदा आणि लसूण बारीक करून घ्या.

स्टेप – 3
एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि तळून घ्या. आता, कांदा आणि लसूण घाला.

स्टेप – 4
कांदा तळून घ्या. यानंतर सुक्या लाल मिरच्या घालून चांगले फेटून घ्या. आणखी एक मिनिट तळून घ्या.

स्टेप – 5
नंतर, हळद घाला आणि कांद्यावर मीठ टाका. धुतलेली ब्रोकोली आता मध्यम आचेवर शिजवा.

स्टेप – 6
जर ते कोरडे झाले तर तुम्ही त्यात थोडे पाणी शिंपडून मध्यम आचेवर शिजवू शकता. लक्षात ठेवा की ब्रोकोली भांड्याला चिकटली नाही पाहिजे. ब्रोकोली शिजल्यावर, लिंबाचा रस घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.

स्टेप – 7
शिजवलेली ब्रोकोली आता शिजवलेल्या तांदळामध्ये चांगली मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालू शकता. गरम असताना सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating broccoli lemon rice is good for health)