AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of eating papaya: पपई खाल्ल्याने तुमचे ‘हृदय’ आणि ‘हाडे’ राहतील मजबूत; आजच करा त्याचा आहारात समावेश !

पपई हे असे फळ आहे, जे जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडते. हे फळ स्वादिष्ट असतात. पपईचे सेवन बहुतेक लोक पोट बरे करण्यासाठी करतात. पण पपई केवळ पोटासाठीच फायदेशीर नाही तर ते आपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवते. जाणून घ्या, पपई खाण्याचे फायदे.

Benefits of eating papaya: पपई खाल्ल्याने तुमचे ‘हृदय’ आणि ‘हाडे’ राहतील मजबूत; आजच करा त्याचा आहारात समावेश !
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 10, 2022 | 10:20 PM
Share

मुंबई : पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाशिवाय पपई हाडांसाठीही फायदेशीर आहे. पपई आपले संपूर्ण शरीर निरोगी (body healthy) ठेवते. यासोबत च पपई तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी घेते. आहारतज्ञ (Dietician) देखील पपई खायला सांगण्याचे हे एक कारण आहे. रोज पपईचे सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल. पौष्टिकतेने भरपूर असलेली पपई अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे. जे लोक पचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांना प्रत्येकजण पपई खाण्याचा सल्ला देतात. पपई पिकलेली असो वा कच्ची, त्याचे अनेक फायदे आहेत. पपई हे एक असे फळ आहे, जे केवळ पौष्टिकतेने परिपूर्ण नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही (Medicinal properties) आहेत. या गुणांमुळे त्याची स्वतःची खास ओळख आहे. कच्ची पपई असो वा पिकलेली, दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, नियासिन, मॅग्नेशियम, कॅरोटीन, फायबर, फोलेट, पोटॅशियम, कॉपर, कॅल्शियम आणि इतर अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात. पपईमध्ये काही प्रमाणात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स देखील असतात. एका लहान पपईमध्ये सुमारे 60 कॅलरीज असतात.

हृदय तंदुरुस्त ठेवते

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

हाडांना फायदा होतो

पपईची खास गोष्ट म्हणजे ती आपली हाडे मजबूत ठेवते. पपईमध्ये लोहासोबतच कॅल्शियमही कमी प्रमाणात राहते, पण त्यात असलेले फॉस्फरस आपल्या हाडांची काळजी घेते. तसे, पपई खाल्ल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो.

हृदयविकारांपासून दूर राहते

पपई केवळ आपल्या हाडांनाच नाही तर हृदयालाही निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्ससह अनेक जीवनसत्त्वे असतात. हे पोषक घटक आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले उच्च फायबर कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करते. कोलेस्ट्रॉल राखले की, आपण हृदयविकारांपासूनही दूर राहतो.

पपई रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. जर व्हिटॅमिन सी भरपूर असेल तर आपली प्रतिकारशक्ती कधीच कमकुवत होत नाही. म्हणूनच पपईला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असेही म्हणतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. व्हिटामिन ए विशेषत: दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय पपईमध्ये असलेले फायबर आपल्या शरीरात विषारी पदार्थ राहू देत नाही, ज्यामुळे पोटही साफ होते. पपईमध्ये आढळणारे पॅपेन एन्झाईम आपल्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगूया. हे एन्झाइम त्वचेचे वय होऊ देत नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?