Special Recipe : घरच्या-घरी तयार करा खास झणझणीत स्प्रिंग रोल, जाणून घ्या रेसिपी!

कोणताही सण आनंद आणि उत्सवसोबत घेऊन येतो. सणाच्या वेळी लोक एकत्र येतात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारचे पदार्थ घरच्या-घरी तयार केले जातात. सणासुदीच्या काळात अनेकदा मिठाईने मन भरून येते, अशा स्थितीत ताजेतवाने म्हणून काहीतरी चटपटीत आणि मजेदार खावेसे वाटते.

Special Recipe : घरच्या-घरी तयार करा खास झणझणीत स्प्रिंग रोल, जाणून घ्या रेसिपी!
स्प्रिंग रोल
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 10:58 AM

मुंबई : कोणताही सण आनंद आणि उत्सवसोबत घेऊन येतो. सणाच्या वेळी लोक एकत्र येतात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारचे पदार्थ घरच्या-घरी तयार केले जातात. सणासुदीच्या काळात अनेकदा मिठाईने मन भरून येते, अशा स्थितीत ताजेतवाने म्हणून काहीतरी चटपटीत आणि मजेदार खावेसे वाटते. आम्ही तुम्हाला स्प्रिंग रोल्सची रेसिपी सांगणार आहोत. हे स्प्रिंग रोल तुम्ही झटपट घरी तयार करू शकता.

साहित्य

अर्धा कप मैदा, चतुर्थांश टीस्पून बेकिंग पावडर, एक चतुर्थांश दूध, एक कप बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेला कांदा, एक कप बारीक चिरलेले गाजर, चार पाकळ्या लसूण, एक चमचा सोया सॉस, काळी मिरी आणि तळण्यासाठी तेल.

तयार करण्याची पध्दत

1- एका भांड्यात मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर टाका आणि दूध किंवा पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्या. यानंतर पीठ तासभर झाकून ठेवा. पीठ थोडे मऊ मळून घ्या.

2- स्टफिंग बनवण्यासाठी कढईत तेल टाकून गरम करा. प्रथम त्यात चिरलेला लसूण घाला. यानंतर चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परता. यानंतर कोबी आणि गाजर घालून दोन ते तीन मिनिटे परतवा. भाज्या हलक्या शिजल्यावर त्यात सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घाला. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.

3- आता मळलेल्या पीठातून रोटी लाटून घ्या. दोन्ही बाजूंनी थोडे तेल लावून थोडेसे बेक करा. यानंतर या रोटीवर स्टफिंग भरून रोल करा. यानंतर पिठाच्या मिश्रणाने दोन्ही बाजूंनी चिकटवा. तळताना स्टफिंग बाहेर पडणार नाही अशा प्रकारे चिकटवा.

4- आता कढईत तेल गरम करून त्यात हे रोल टाका आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. स्प्रिंग रोल तयार आहेत. आता त्याचे तुकडे करून चटणीसोबत सर्व्ह करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..