AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diet | वजन कमी करण्यासाठी डाएट करताना या खास गोष्टी फाॅलो करा, वाचा सविस्तरपणे!

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खावे किंवा दिवसभर उपाशी राहवे. मात्र, हे चुकीचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या आहारामध्ये हेल्दी गोष्टींचा समावेश करा. तसेच बाहेरील फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. याशिवाय आपल्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

Diet | वजन कमी करण्यासाठी डाएट करताना या खास गोष्टी फाॅलो करा, वाचा सविस्तरपणे!
Image Credit source: nsplash.com
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 11:30 AM
Share

मुंबई : शारीरिक आणि मानसिक आरोग्य (Health) राखण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिन्यांचा रोजच्या आहाराच्या समावेश असावा. दैनंदिन जीवनातील बदल, अति खाणे, तणाव हे सर्व वजन वाढण्यास जबाबदार आहेत. आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण पौष्टिक आहार (Nutritious diet) तितकाच आवश्यक आहे. अनेकांना असे वाटते की जे उपाशी राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, जर तुम्हालाही असेच वाटत असेलतर तुम्ही 100 टक्के चुकीचे आहात. उपाशी राहून वजन कमी (Weight loss) करणे अशक्य गोष्टी आहे. उलट उपाशी राहिल्याने वजन कमी होण्याऐवजी आपल्या आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होऊ शकतात.

उपाशी राहून वजन कमी करणे चुकीचे

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खावे किंवा दिवसभर उपाशी राहवे. मात्र, हे चुकीचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या आहारामध्ये हेल्दी गोष्टींचा समावेश करा. तसेच बाहेरील फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. याशिवाय आपल्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण खूप महत्वाचे आहे. रात्री सातच्या अगोदर जेवण करा आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळा फिरा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गोड पदार्थ खाणे टाळाच

अनेकजणांना गोड खाण्याची इच्छा असते. मात्र, साखर खायची नाही, म्हणून ते मधासारखे पर्यायी पदार्थ शोधतात. असे लोक साखरेपेक्षा नैसर्गिकरित्या आढळणारे गोड पदार्थ चांगले आहे असं समजतात. मात्र, अशा गोड पदार्थांमध्ये कोणतेही अतिरिक्त पोषणद्रव्ये नसतात. शिवाय कॅलरिजचं प्रमाण देखील कमी नसतं. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मध किंवा इतर गोड पदार्थ खाल्याने तसा काहीही फरक पडत नाही. यामुळे जर आपल्याला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आपण आहारामध्ये अजिबात गोड पदार्थांचा समावेश करून नये.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात