Study: गुळवेलमुळे तुमचं यकृत खराब होऊ शकतं; वाचा कारण काय?

| Updated on: Jul 04, 2021 | 3:12 PM

गुळवेल वजन कमी करणे, त्वचेच्या समस्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. असे अनेक लोकांना वाटते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक गुळवेलच्या काढाचे सेवन करत आहेत.

Study: गुळवेलमुळे तुमचं यकृत खराब होऊ शकतं; वाचा कारण काय?
गुळवेल
Follow us on

मुंबई : गुळवेल वजन कमी करणे, त्वचेच्या समस्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. असे अनेक लोकांना वाटते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक गुळवेलच्या काढाचे सेवन करत आहेत. तज्ञांच्या मते, या औषधी वनस्पतींचा वापर आहारात केल्याने गंभीर नुकसान आपल्या शरीराला होऊ शकते. (Heart leaved moonseed dangerous to health)

मुंबईतील डॉक्टरांना असे आढळले की, सप्टेंबर 2020 ते डिसेंबर दरम्यान गुळवेलचे सेवन केल्याने सहा जणांच्या यकृताचे गंभीर नुकसान झाले आहे. हे सर्व रुग्ण कावीळ, सुस्तपणाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात आले होते.

62 वर्षीय महिलेचा मृत्यू

हेपेटोलॉजिस्ट डॉक्टर आभा नगराल यांच्या म्हणण्यानुसार, 62 वर्षाची एक महिला तिच्या पोटात संबंधित तक्रारीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. लिक्विड महिलेच्या ओटीपोटात जमा झाले होते, हे यकृत खराब होण्याचे कारण असू शकते. चार महिन्यांनंतर या महिलेचा मृत्यू झाला. डॉ. आभा यांच्या मते, बायोप्सीच्या अहवालात आम्हाला आढळले की, त्या महिलेने गुळवेलचा काढा पिला होता. त्याची अहवाल स्टडी जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजिस्टमध्ये प्रसिद्ध झाली आहे. इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ द लिव्हर यांनी हा अभ्यास प्रकाशित केला आहे.

गुळवेल यकृतसाठी हानिकारक

यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉक्टर ए. एस सोइन म्हणाले की, यकृत खराब होण्याची पाच प्रकरणे त्यांनी पाहिली आहेत. त्यातील एक रुग्ण तर मरण पावला आहे. कोरोना कालावधीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बरेच लोक गुळवेलचा समावेश दररोजच्या आहार करत आहेत. गुळवेल शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. यामुळे बर्‍याच लोकांचे यकृत खराब होत आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Heart leaved moonseed dangerous to health)