चहासोबत खायचंय काहीतरी चटपटीत? अवघ्या काही मिनीटात बनवा स्पायसी पोटॅटो, सोपी आहे रेसिपी
Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत, मसालेदार खायला प्रत्येकाला आवडते. पण तुमच्याकडे बनवण्यासाठी वेळ नसेल तर ट्राय करा ही झटपट तयार होणारी रेसिपी. स्पायसी पोटॅटोची ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी काहीतरी स्नॅक्स खायला प्रत्येकाला आवडते. त्यातही गरमा गरम चहासोबत चटपटीत खायची क्रेविंग नेहमीच असते. जर तुम्हाला सुद्धा काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, तर तुम्ही बटाट्यापासून एक स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याची ही डिश खूप लवकर तयार होते. हा पदार्थ आहे पोटॅटो स्पायसी. हे बनवायला खूप सोपे आहे आणि झटपट तयार होते. हे मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. स्पायसी पोटॅटोची ही रेसिपी अर्ध्या तासात तयार होते. चला तर जाणून घेऊया स्पायसी पोटॅटो कसे बनवायचे.
स्पायसी पोटॅटो बनवण्यासाठी साहित्य
– बटाटा
– कॉर्न फ्लोअर
– हिरवी मिरची
– कोथिंबीर
– चिरलेला हिरवा कांदा
– चाट मसाला
– काळी मिरी पावडर
– चिली फ्लेक्स
– ओरेगॅनो
स्पायसी पोटॅटो बनवण्याची पद्धत
स्पायसी पोटॅटो बनवण्यासाठी बटाट्याचे मधून चार तुकडे करा. यानंतर बटाटे शॅलो फ्राय करा. जेणेकरून ते चांगले शिजतील. तुम्ही ते धुवूनही कॉर्न फ्लोअरने कोट करू शकता. यानंतर, ते चांगले तळल्यानंतर, एका भांड्यात काढा. आता त्यात काळे मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घाला. त्यावर चिरलेली कोथिंबीरही टाकू शकता. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची टाकल्याने त्याची चव वाढते. चटणीबरोबर सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासोबत सर्व्ह करू शकता. हे खूप स्पायसी आहे त्यामुळे लहान मुलांना देताना त्यात मिरची आणि मसाले कमी घाला. लहान मुलांना ही डिश खूप आवडेल.