AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Breakfast : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

वजन कमी करणे सोपे काम नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, काय खावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही असे काही पदार्थ खाऊ शकता, जे तुम्हाला भूक कमी करण्यास आणि तुमचे पोट बऱ्याच काळ भरलेले ठेवण्यास मदत करेल. नाश्ता वगळणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Healthy Breakfast : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा!
नाश्ता
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 10:39 AM
Share

मुंबई : वजन कमी करणे सोपे काम नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, काय खावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही असे काही पदार्थ खाऊ शकता, जे तुम्हाला भूक कमी करण्यास आणि तुमचे पोट बऱ्याच काळ भरलेले ठेवण्यास मदत करेल. नाश्ता वगळणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपण असा निरोगी नाश्ता बनवू शकता, जे खाण्यासाठी हेल्दी आणि ज्यामुळे वजनही वाढणार नाही.

अंडा ऑमलेट

अंड्यामध्ये पोषक द्रव्ये जास्त आणि कॅलरीज कमी असतात. आपण दोन किंवा तीन अंड्याचे ऑमलेट तयार करू शकता. या ऑमलेटमध्ये चीजसह टोमॅटो आणि मशरूमसारख्या भाज्या घालून काही वेळातच एक स्वादिष्ट ऑमलेट बनवू शकता.

भोपळा-सफरचंद स्मूथी

बदामाचे दूध, सफरचंद, भोपळा, दही, बर्फ, मॅपल सिरप, भोपळा आणि मीठ एकत्र ब्लेंडरमध्ये मिसळा. सर्व्ह करण्यापूर्वी, त्यावर 1 टिस्पून ग्रॅनोला टाका.

पालक ऑमलेट

प्रथम, कांदा, टोमॅटो, मिरची आणि पालक धुवून बारीक चिरून घ्या. आता एका वाडग्यात अंडी फेटून घ्या. आवश्यकतेनुसार मीठ, कसूरी मेथी, काळी मिरी आणि भाज्या घाला. ते चांगले फेटून घ्या. आता एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात मिश्रण घाला आणि दोन्ही बाजूंनी बेक करा.

अॅव्होकॅडो टोस्ट

ब्रेड टोस्ट करा, आपण कोणत्याही प्रकारच्या टोस्ट किंवा कापलेल्या ब्रेडचा वापर करू शकता. एका छोट्या वाडग्यात काट्यासह अॅव्होकॅडो मॅश करा. कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड यांचे मिश्रण ब्रेडच्या टोस्टेड कापांवर पसरवा. त्यात काळी मिरी घालून सर्व्ह करा.

पोहे

पोहे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कांदा, गाजर, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मीठ टाकून पोहे तयार केले जातात. भारतीय घरांमध्ये हा नाश्ता नेहमी तयार केला जातो. पोहे फायबर समृद्ध असतात आणि कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा परिपूर्ण नाश्ता आहे. त्यात लोह, प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात.

उपमा

उपमा तेल, रवा, कढीपत्ता, शेंगदाणे, मोहरी, चणा डाळ आणि मीठ यापासून बनवले जाते. रवा एक निरोगी घटक म्हणून ओळखला जातो. जो संतुलित आहार राखण्यास मदत करतो. त्यात लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम समृद्ध आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे पचन प्रणाली देखील सुधारते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 6 foods in breakfast for weight loss)

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.