
वजन कमी करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्यापैकी सेलिब्रिटी आपल्या आहारामध्ये अँटी-ऑक्सिडंट पदार्थांचा समावेश करतात. हे पदार्थ नेमके कोणते हे बघुयात.

वजन कमी करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण व्यायाम आणि डाएटमुळे आपल्याला थकवा अधिक जाणवतो.

ग्रीन टी ही वजन कमी करण्यासाठी प्रमुख घटक आहे. यामध्ये कॅटेचिन नावाचे संयुग असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हे चयापचय वाढवते आणि कर्करोग प्रतिबंधित करते.

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी देखील खूप फायदेशीर आहे. ब्लॅक टी आणि ग्रीन टी दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. ब्लॅक टी वजन कमी करण्यास तसेच उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

बदामामध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. ज्यांना वेळोवेळी भूक लागते त्यांनी बदामाचे सेवन करावे. त्यात भरपूर प्रथिने आणि खनिजे असतात.