Health Care Tips | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ही फळे खा आणि निरोगी राहा!

उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कलिंगडमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ते चविष्ट तर असतेच, पण त्यात पोषक तत्वांचे प्रमाणही जास्त असते. त्यात 90 टक्के प्रमाण पाणी असते. हे फळ हृदयासाठीही फायदेशीर आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगडचा आहारामध्ये समावेश करा.

Health Care Tips | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ही फळे खा आणि निरोगी राहा!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 2:05 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये निर्जलीकरणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. निर्जलीकरणामुळे थकवा देखील जाणू लागतो. या हंगामात स्वतःला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे फार महत्वाचे आहे. या हंगामात तुम्ही आहारामध्ये काही फळांचा समावेश करून निरोगी राहू शकता. ज्यामध्ये स्ट्रॉबेरी, कलिंगड आणि अननस यांसारख्या फळांचा समावेश आहे. ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काम करतात आणि ऊर्जा देखील देतात. तुम्ही ज्यूस (Juice), स्मूदी आणि स्नॅक्सच्या स्वरूपात ही फळे खाऊ शकता. ही फळे खूप चविष्ट असतात. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात तुम्ही कोणत्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कलिंगडमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ते चविष्ट तर असतेच, पण त्यात पोषक तत्वांचे प्रमाणही जास्त असते. त्यात 90 टक्के प्रमाण पाणी असते. हे फळ हृदयासाठीही फायदेशीर आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगडचा आहारामध्ये समावेश करा.

आंबा

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यात सुमारे 80 टक्के पाणी असते. तसेच त्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि दृष्टी सुधारते. विशेष म्हणजे या हंगामामध्ये आंबा सहज उपलब्ध होणारे फळ आहे. फळांचा राजा आंबा हा आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. ते पाचन समस्या दूर करते. तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, फोलेट, पोटॅशियम, बी व्हिटॅमिन आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हृदयरोग रोखण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

अननस

अननसात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील जास्त असतात. ते खूप चवदार असते. अननसमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. जे पेशींच्या नुकसानाशी लढण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. यामध्ये मॅंगनीज असते, जे हाडे निरोगी ठेवते. यामुळे आहारामध्ये अननसचा समावेश केला करा.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.