सर्दीपासून बचावासाठी घरीच बनवा स्वादिष्ट बेसनाचा हलवा, जाणून घ्या रेसीपी

काही गोड खाण्याचे मन झाल्यास डोळ्यासमोर हलवा नक्की येतो. बाजारामध्ये हलव्याचे विविध प्रकार सहज उपलब्ध असतात. आपण ते खरेदी करून, घरी आणून खाऊ शकतो. मात्र स्वच्छता आणि आरोग्याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरीच बेसनाचा उत्तम स्वादिष्ट असा हलवा बनवू शकता. 

सर्दीपासून बचावासाठी घरीच बनवा स्वादिष्ट बेसनाचा हलवा, जाणून घ्या रेसीपी
बेसनाचा हलवा
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 1:11 AM

Gram Flour halwa recipe : काही गोड खाण्याचे मन झाल्यास डोळ्यासमोर हलवा नक्की येतो. बाजारामध्ये हलव्याचे विविध प्रकार सहज उपलब्ध असतात. आपण ते खरेदी करून, घरी आणून खाऊ शकतो. मात्र स्वच्छता आणि आरोग्याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरीच बेसनाचा उत्तम स्वादिष्ट असा हलवा बनवू शकता.  अवघ्या काही वेळात हा बेसन हलवा  बनवून तयार होतो. तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना देखील स्वीट डीश म्हणून हा हलवा देऊ शकता. या हलव्याचा एक मुख्य फायदा म्हणजे जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये (Winters) हा हलवा खाल्यास तुम्ही सर्दीपासून दूर राहू शकता. तज्ज्ञांच्या मतानुसार मुलांना सर्दीसारख्या आजारांपासून दूर ठेववण्यासाठी बेसनाचा हलवा हा सर्वोत्तम आहे. हा हलवा स्वादिष्ट तर आहेच सोबत आरोग्याला देखील पोषक असा आहे. आज आपण या हलव्याची रेसीपी (Halwa recipe) जाणून घेणार आहोत.

तयार करण्यासाठी साहित्य

1 कप बेसन

2 कप दूध

साखर चवीनुसार

100 ग्रॅम तूप

4 वेलची

सुका मेवा ठेचून

असा तयार करा हलवा

एक भांडे घ्या त्यात एक कप बेसन ओता, आता हे बेसन भाजायला सुरुवात करा. बेसन भाजताना ते नेहमी मंद अचेवरच भाजा. बेसन चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये आता दूध घालून, पुन्हा एकदा त्याला भाजून घ्या, त्यानंतर गॅस बंद करा. आता एक कढई घेऊन त्यात तूप गरम करा. त्यामध्ये वेलची बारीक करून, टाका सोबतच  साखर आणि पाणी घालून साखरेचा पाक तयार करा. आता तयार पाकात भाजलेले बेसन घालून थोडा वेळ शिजू द्या. मिश्रण सतत ढवळत रहा, त्यानंतर त्यात सुक्या मेव्याचा चुरा घाला. त्यानंत हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहा. हे मिश्रम घट्ट झाल्यानंतर कढई गॅसवरून खाली घ्या. अशा पद्धतीने तुमचा हलवा तयार झाला आहे. हलवा थंड झाल्यानंतर तुम्ही त्याचा अस्वाद घेऊ शकता.

संबंधित बातम्या

Love Relationship: इमोशनल पार्टनरला सांभाळण्यासाठी हे उपाय करुन पाहा, नात्यात परतेल गोडवा

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? वाचा प्रसिध्द शेफने केलाय यावर खुलासा…

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे