तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? वाचा प्रसिध्द शेफने केलाय यावर खुलासा…

अंडी फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ही बातमी लक्षपूर्ण वाचा, प्रसिध्द सेलिब्रिटी शेफ असलेल्या जेम्स मार्टिन यांनी आपल्या ‘दिस मॉर्निंग किचन’ या शोमध्ये अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याचे नुकसान सांगितले आहे, शिवाय त्यांनी अस केल्याने अंड्यात किंवा त्यापासून तयार होत असलेल्या पदार्थांमधील बदलदेखील सांगितलाय...

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? वाचा प्रसिध्द शेफने केलाय यावर खुलासा...
अंडी
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 10:08 AM

सकाळचा नाश्‍ता (Breakfast) म्हटला की, अनेकांचा दिवस अंडी किंवा ऑमलेटपासून (Omelette) हमखास सुरु होत असतो. जे लोक मांसाहारी आहेत, ते नेहमी आपल्या नाश्‍त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात अंड्यांचा समावेश करीत असतात. अंड्यातून मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळत असते. तसेच अंड्यांचा पांढरा भाग हा हाडांसाठी चांगला असल्याने अनेक जण सकाळच्या नाश्‍त्यात अंडी, ऑमलेट, केळी, दूध, सफरचंद आदी सकस आहाराचा समावेश करीत असतात.

दररोज लागत असल्याने वारंवार आणण्यापेक्षा अनेक जण एकाच वेळी एक ते दोन डजन अंडी आणून ती फ्रिजमध्ये (Fridge) साठवण्याला प्राधान्य देत असतात. परंतु ही अंडी अनेक दिवस फ्रिजमध्ये पडून राहिल्याने त्यावर नेमका कुठला परिणाम होता, याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत असते. परंतु नुकतेच ब्रिटीश शेफ जेम्स मार्टिन यांनी आपल्या एका ‘दिस मॉर्निंग किचन’या शोमध्ये अंडी फ्रिजमध्ये ठेवण्यावर भाष्य केले आहे. सोबतच त्यांनी यातून अंड्यांच्या चवीत होत असलेल्या बदलाबाबतही चर्चा केली आहे.

चवीत होतो आमुलाग्र बदल

जेम्स यांनी अंडी फ्रिजमध्ये ठेवण्यास तीव्र विरोध केला आहे. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्याने त्याच्या व त्याच्यापासून तयार पदार्थांवर आमुलाग्र बदल होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, अंड्यांच्या कातडीत खूप लहान लहान छिद्रे असतात. जर त्यांना फ्रिजमध्ये ठेवले तर इतर पदार्थांचा गंध तसेच चव ही अंड्यांच्या छिद्रांमधून जात अंड्यांची मुळ चव बिघडते. जर तुम्हाला अंड्याची खरी चव चाखायची असेल तर त्याला फ्रिजमध्ये ठेवणे टाळण्याचा सल्ला जेम्स मार्टिन यांच्याकडून देण्यात आला आहे. यासाठी त्यांनी एक प्रयोगदेखील करण्यास सांगितला आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले अंड व बाहेरील अंड यापासून तुम्ही एकाच पध्दतीचा पदार्थ तयार करा, आता त्याचा रंग व चव ही कशी आहे, याची पडताळणी करा, यात अनेक बदल जाणवतील असा दावा जेम्स यांनी केला आहे.

अंडी स्वच्छ करुनच वापरा

अंडी उकळून खायची असल्यास किंवा त्यापासून काही पदार्थ बनवायचा झाल्यास सर्वात आधी त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे नंतरच त्याचा वापर करण्याचा सल्ला जेम्स यांनी दिला आहे. अनेक जण बाजारातून अंडी आणल्यावर त्याला न धूताच ते उकळतात किंवा त्याचा वापर करतात. परंतु हे अयोग्य आहे. अंडी न धूताच वापरल्यास अंड्याबाहेरील अनेक किटाणू वा घाण ही उकळलेल्या अंड्यावर जमा होते, किंवा त्यापासून तयार झालेल्या पदार्थांमध्ये समाविष्ट होत असते. सोबतच तुम्ही कच्च्या अंड्याचा वापर करीत असाल तर, अंड फोडल्यावर त्यावरील घाण अंड्यासोबत मिसळून तुमच्या पोटात जाउ शकते. त्यामुळे बाहेरुन आणल्यावर अंडी नेहमी स्वच्छ करुनच त्याचा वापर करावा.

अंड्याचे आहेत अनेक फायदे

सर्वसामान्यपणे सर्व मांसाहारी लोक आपल्या रोजच्या आहारात अंड्यांचा वापर नक्की करतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण घटक असतात. यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळत असते. शिवाय यातून कोलेस्ट्रोलची समस्या दूर होत असते. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणून अंड्यांकडे पाहिले जात असते. ह्रदयविकाराची समस्या असल्यास तीसुध्दा यातून दूर होते. वजन कमी करणे तसेच डोळ्यांसाठीही अंडी खाणे फायद्याचे ठरते, त्यामुळे तज्ज्ञांकडूनही आपल्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येत असतो.

संबंधित बातम्या : 

‘या’ सवयींमुळे तुमची हाडे होऊ शकतात ठिसूळ, वेळीच सावध व्हा…

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या…

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.