AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या…

वाढत्या वयासोबत आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. अनेक घटकांची शरीराला कमतरता जाणवल्यास शरीरात त्याची काही लक्षणे दिसून येतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, त्वचेला सुरकुत्या पडणे आदी वाढत्या वयातील समस्या अनेकांना सहन कराव्या लागत असतात. परंतु वाढत्या वयाला अनुसरून योग्य आहार ठेवल्यास या समस्यांचा कमी त्रास होतो.

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या...
nutritious food (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 4:57 PM
Share

मुंहई : वय वाढते तसे विविध व्याधी जडत जातात. शरीरात अनेक बदल होतात. कोणाला याचा त्रास कमी होता तर कुणाला कमी वयातच अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असते. शरीरातील हे बदल बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते, की शरीरातील कुठल्या ना कुठल्या कमतरतेमुळे वाढत्या वयासोबतची लक्षणे त्रस्त करतात. वेळीच शरीरातील लक्षणांवर उपाय योजना केल्यास वाढत्या वयातही आपण निरोगी सुदृढ आयुष्य जगू शकतो. जसजसे म्हातारपण (Aging) जवळ येते तसतसे माणसाचे शरीरही कमजोर होते. अशा परिस्थितीत आवश्यक पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. सर्वच जण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, खरं तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (healthy) राहिलो तर म्हातारपणही खूप उशिरा येते. म्हातारपणामुळे आपल्या सर्वांच्या आत अनेक प्रकारचे शारीरिक बदल होऊ लागतात. शरीराला तंदुरुस्त ठेवणारे नैसर्गिक (Natural) घटकही कमी होऊ लागतात. यामुळेच आपण आपल्या सकस आणि पौष्टिक आहाराची (Nutrients) पूर्ण काळजी घेतली पाहिजे.

सकस आहाराकडे लक्ष न दिल्यास स्नायू कमकुवत होणे, हाडे कमजोर होणे आदी समस्या निर्माण होत असतात. वाढत्या वयासोबत केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते. अशा वेळी आपल्या शरीराला कोणत्या घटकांची अधिक आवश्यकता असते, हे जाणून घेणे महत्वाचे असते.

व्हिटॅमिन बी 12 आणि 6

‘व्हिटॅमिन बी 12’ हे शरीरात रक्त आणि चेतापेशी तयार करण्यात मदत करते. मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थातून हे सहज उपलब्ध होते. तुम्ही मांसाहारी नसाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे तसेच पूरक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय ‘व्हिटॅमिन बी 6’ जंतूंशी (Germs) लढण्यासाठी तसेच शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी फायद्याचे आहे, यामुळे वाढत्या वयातही स्मरणशक्तीही चांगली राहण्यास मदत होत असते.

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम

आपण सर्वांना माहिती आहे, कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. म्हातारपणी शरीराला कॅल्शियमची खूप गरज असते, अनेक वेळा डॉक्टरांकडून कॅल्शियमच्या गोळ्यादेखील देण्यात येत असतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आहारात दूध, दही इत्यादींचा समावेश केला पाहिजे. यासोबतच शरीराला मॅग्नेशियमचीही खूप गरज असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही स्थिर राहते. मॅग्नेशियमसाठी काजू, बिया आणि पालेभाज्या आदींचा आहारात समावेश असावा.

ओमेगा 3 s आणि व्हिटॅमिन डी

शरीराला ‘ओमेगा 3 s’ फॅटी ॲसिडस्’ हे स्वतः कसे बनवायचे माहित नसते. मेंदू, चेतापेशी आणि शुक्राणू पेशींसाठी ते आवश्यक असते. वाढत्या वयातील अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि अंधत्व टाळण्यासाठी शरीरात ‘ओमेगा 3’ असणे आवश्यक आहे, यासाठी फॅटी मासे, अक्रोड यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. याशिवाय सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘व्हिटॅमिन डी’ हे वृद्धापकाळात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्डिन, मॅकरेल इत्यादी माशांचा आहारात समावेश असावा.

झिंक आणि पोटॅशियम

झिंक आपल्यास वासाची आणि चवीची क्षमता वाढवते, ते शरीरातील संसर्ग आणि इतर आजारांशी लढण्याची क्षमताही वाढवत असते, यातून दृष्टी सुधारते. ही कमतरता भरून काढण्यासाठी, सकस नाश्ता घेतला पाहिजे. पोटॅशियम हृदय, स्नायू, मूत्रपिंड आणि मज्जातंतूंसाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता पालक, दूध, केळी इत्यादींच्या सेवनाने भरून निघते.

इतर बातम्या

Tea | नको जिम, नको डाएट, आठ प्रकारचे चहा पिऊन पोटावरची चरबी कमी करा

Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!

Amritsar Famous Dishes : ‘या’ 5 स्वादिष्ट अमृतसरी डिशेस तुम्ही नक्की ट्राय करा!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.