ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे
child glasses problems

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुले ‘गॅजेट्स फ्रेंडली’ झाली आहे. परंतु याचे जसे फायदे तसे शरीराला नुकसानही मोठ्या प्रमाणात आहे. ऑनलाईन शिक्षण, मोबाईलचा अतिरेक तसेच इतर डिजिटल माध्यमांमुळे मुलांमध्ये डोळ्यांसबंधी समस्या वाढलेल्या दिसतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 18, 2022 | 9:10 AM

मुंबई : जसाजसा तंत्रज्ञानाचा आविष्कार होत गेला तसा आपल्या जीवनपध्दतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नवी पिढी सर्वात पुढे असते. ऑनलाईन शिक्षण, मोबाईलचा (Mobile) अतिवापर आदींमुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर वाईट परिणाम होत आहेत. यातून त्यांना अनेकदा डोळ्यात जळजळ होण्याचा तक्रारी वाढत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. घरातील अन्न घाण्यापेक्षा मुलांना बाहेरील ‘जंक फूड’(Junk food) जास्त आवडते. यातून मुलांना अनेक आजार जडतात. त्याचबरोबर ‘गॅजेट्स फ्रेंडली’ (Gadgets) असल्याने मुलांच्या डोळ्यांवर आणि मनावर वाईट परिणाम होत आहे. मुलांच्या डोळ्यांशी संबंधित या समस्यांकडे पालक लक्ष देत नसल्याचेही दिसून येते. डोळ्यांवर वाईट परिणाम झाल्यामुळे अनेकदा मुलांना चष्मा लावावा लागतो. इतर अनेक कारणे आहेत ज्यांच्या लक्षणातून मुलाला चष्मा (glasses) लागणार की नाही ते आपणास समजू शकते.

1) अभ्यास करताना अडचणी

अभ्यास करीत असताना जर मुलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या जाणवत असतील तर या लक्षणांकडे वेळीच बघणे आवश्‍यक असते. अभ्यासातील अडचणीमागे डोळ्यांच्या समस्येचे कारण असू शकते. मुलाला शाळेतून गृहपाठ किंवा इतर कामांवर लक्ष केंद्रित करता येत नसेल, तो वारंवार डोळ्यांची समस्या सांगत असेल तर, तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणे योग्य ठरते.

2) डोळे चोळणे

‘गॅजेट्स’चा अतिवापर करण्याबरोबरच वाढत्या प्रदूषणामुळेही मुलांच्या डोळ्यांच्या समस्या निर्माण होउ शकतात. त्यांच्या डोळ्यात अनेकदा जळजळ किंवा चूळचूळ होत असते. त्यामुळे मुले जोरात डोळे चोळू लागतात, परंतु हे डोळ्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकते. तसेच हेदेखील चष्मा लागण्याचे लक्षण मानले जाते. जर मूले वारंवार डोळे चोळत असतील तर हे डोळे कमकुवत होण्याचे लक्षण समजावे, मुलांना डॉक्टरांकडे नेऊन उपचार घ्यावे.

3) डोकेदुखीची समस्या

टी. व्ही., मोबाईल आदी गॅजेट्सच्या अतिरेकामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अनेकदा मुलांना डोकेदुखीची तक्रार होऊ लागते. जर मुल वारंवार डोके दुखत असल्याची तक्रार करत असतील तर त्यांना चष्मा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, कमकुवत डोळ्यांनी लक्ष केंद्रित केल्याने डोकेदुखी होऊ शकते.

4) डोळ्यांमधील थकवा

अनेकदा मुले लक्ष केंद्रीत करुन काही वाचू शकत नाही, पाहू शकत नाही, डोळ्यातून पाणी येते अशा वेळी मुलाच्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर त्याच्या डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, जर त्यांना चष्म्याची गरज असेल, तर त्याचा वापर नक्की करावा.

संबंधीत बातम्या : 

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या…

फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें