Weight Loss | बेसनच्या पीठापासून बनवलेले हे स्वादिष्ट पदार्थ वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर!

एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या आणि त्यात पाणी घाला. चांगले फेटून घ्या. मीठ, मिरपूड, लाल मिरची, भाज्या आणि मसाले घाला. 5 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पॅन गरम करा. त्यात थोडं तूप घाला. आता हे मिश्रण तव्यावर ओतावे. आणि चांगले गोलाकारामध्ये पसरून घ्या. त्यानंतर हे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Weight Loss | बेसनच्या पीठापासून बनवलेले हे स्वादिष्ट पदार्थ वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर!
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 9:58 AM

मुंबई : बेसनाचा वापर स्वयंपाकघरात अनेक पदार्थ (Food) बनवण्यासाठी केला जातो. बेसनापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. बेसनमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, फोलेट, थायामिन, जस्त, तांबे असे अनेक पोषक घटक असतात. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवणे किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही बेसनापासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू शकतो. यासोबतच हे पदार्थ वजन कमी (Weight Loss) करण्यासही मदत करतात. ते बनवणे देखील खूप सोपे आहे, बेसनापासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात (Diet) समावेश केला जाऊ शकतो आणि वजनावर नियंत्रण देखील मिळवले जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात बेसनापासून तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल सविस्तरपणे.

चिला

एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या आणि त्यात पाणी घाला. चांगले फेटून घ्या. मीठ, मिरपूड, लाल मिरची, भाज्या आणि मसाले घाला. 5 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पॅन गरम करा. त्यात थोडं तूप घाला. आता हे मिश्रण तव्यावर ओतावे. आणि चांगले गोलाकारामध्ये पसरून घ्या. त्यानंतर हे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह करा, हे खूप चवदार आणि खूप आरोग्यदायी आहे.

बेसन टोस्ट

बेसनाचा टोस्ट बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एका भांड्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ आणि तुमच्या आवडीचे मसाले टाका. त्यात पाणी घालून मिक्स करा, आता ब्राउन ब्रेडचे दोन तुकडे करा, पिठात बुडवा, आता ही ब्रेड पॅनमध्ये थोडे लोणी किंवा तूप घालून टोस्ट करा, गरम सर्व्ह करा.

ढोकळा

बेसन, मीठ, साखर आणि हळद एका भांड्यात घ्या. त्यात पाणी टाका, नीट मिसळा, वाफवलेल्या पॅनला थोडं तेल लावून ग्रीस करा. एका ग्लासमध्ये बेकिंग पावडर आणि थोडे पाणी एकत्र करा, आता बेसनच्या द्रावणात मिसळा, आता हे द्रावण एका वाफवलेल्या पॅनमध्ये ठेवा, 15 मिनिटे वाफ येऊ द्या, त्यानंतर त्याचे तुकडे करा, आता सर्व्ह करा.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.