Mango Peel Benefits | आंब्याची सालं कचरा समजून फेकून देताय? थांबा, आधी जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे!

आंब्याचा हंगाम सध्या शिगेला पोहचला आहे आणि आपल्यापैकी सर्वांनाच हा हंगाम आवडतो. बरेच लोक या हंगामाची आतुरतेने वाट बघतात, कारण त्यांना आंबा खाण्याची संधी हवी असते. आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हणतात. प्रत्येकाला त्याची अप्रतिम चव खूप आवडते.

Mango Peel Benefits | आंब्याची सालं कचरा समजून फेकून देताय? थांबा, आधी जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे!
आंब्याचे साल

मुंबई : आंब्याचा हंगाम सध्या शिगेला पोहचला आहे आणि आपल्यापैकी सर्वांनाच हा हंगाम आवडतो. बरेच लोक या हंगामाची आतुरतेने वाट बघतात, कारण त्यांना आंबा खाण्याची संधी हवी असते. आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हणतात. प्रत्येकाला त्याची अप्रतिम चव खूप आवडते. या हंगामात अनेक प्रकारचे आंबे बाजारात मिळतात. आंबा हे फळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे (Mango Peel Benefits know the health benefits of mango peel).

आपल्या सर्वांनाच हे माहित आहे की, सामान्यपणे आरोग्यासाठी तो किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, त्याची साले देखील आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. हे बर्‍याच अभ्यासातून समोर आले आहे. आंब्याचे साल अँटी-ऑक्सिडेंटनी समृद्ध आहे, जे शरीराला बर्‍याच रोगांपासून वाचवण्याचे काम करते. चला तर, जाणून घेऊया आपण हे साल कसे वापरू शकता आणि ते किती फायदेशीर आहे.

आंब्याची साल कशी वापराल?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण स्मूदी तयार करण्यासाठी आंब्याच्या सालाचा वापर करू शकता. आंब्याची साल धुवून झाल्यावर तुम्ही ते वापरू शकता, हे लक्षात घ्या. आंब्याचे साल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते. युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड स्कूल ऑफ फार्मसीच्या अभ्यासानुसार नाम डॉक माई आणि इर्विन जातीच्या आंब्याच्या सालामुळे शरीरातील चरबीच्या पेशी कमी होतात आणि त्याद्वारे वजन कमी होण्यास मदत होते.

रोग प्रतिकारशक्ती आणि पाचक प्रणाली मजबूत होते.

आंब्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, जे पाचन तंत्राला बळकट करण्यात मदत करते. याशिवाय व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करते.

तज्ज्ञांच्या मते, आंब्याचे साल त्वचेसाठी चांगले असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्यासाठी आपण याचा वापर करू शकता. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.

कर्करोगाच्या उपचारात फायदेशीर

आंब्याच्या सालामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि कर्करोग विरोधी गुणधर्म असतट, जो फुफ्फुस, स्तन, आतडे, मणक्याच्या हाडाच्या कर्करोगच्या उपचारांमध्ये फायदेशीर ठरतात. यात वनस्पती-आधारित संयुगे आहेत जे मधुमेह कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

हृदयासाठी फायदेशीर

आंब्याचे साल फायटोन्यूट्रिएंटने समृद्ध आहे, जे हृदयासाठी फायदेशीर आहे आणि त्या संबंधित समस्या टाळण्यास देखील मदत करते. एका अभ्यासानुसार फायबर समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका 40 टक्के कमी होऊ शकतो.

(Mango Peel Benefits know the health benefits of mango peel)

हेही वाचा :

तुम्ही कधी कच्च्या खाद्यपदार्थांचा डाएट ट्राय केला आहे का? जाणून घ्या वनस्पतीआधारीत पोषणाचे फायदे

कोरोना लसीचा डोस घेण्यापूर्वी भरपूर पाणी प्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा काय आहे सल्ला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI