कोरोना लसीचा डोस घेण्यापूर्वी भरपूर पाणी प्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा काय आहे सल्ला

अधिक पाणी प्यायल्यामुळे लसीकरणानंतर होणारे विविध दुष्परिणामांचा धोका कमी होऊ शकतो. किंबहुना विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात. (Drink plenty of water before taking a dose of corona vaccine; know what expert advice is)

कोरोना लसीचा डोस घेण्यापूर्वी भरपूर पाणी प्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा काय आहे सल्ला
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची भलतीच चिंता वाढवली होती. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट आधीच रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. देशात लसीकरण मोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे. याचवेळी लसीकरणाचे दुष्परिणाम अर्थात साईड इफेक्ट्सही समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लस घ्यायला जाण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. अधिक पाणी प्यायल्यामुळे लसीकरणानंतर होणारे विविध दुष्परिणामांचा धोका कमी होऊ शकतो. किंबहुना विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात. (Drink plenty of water before taking a dose of corona vaccine; know what expert advice is)

सुरुवातीला आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की लस घेतल्यानंतर सर्वात आधी नेमके कोणते साइड इफेक्ट्स होतात? लसीकरणानंतर अ‍ॅण्टी बॉडी तयार होते. रोगप्रतिकारक शक्ती संरक्षण मोडमध्ये जाते.

केवळ पाणी पिण्यामुळे दुष्परिणाम कमी होतात?

केवळ पाणी पिण्यामुळे लस घेतल्यानंतरचे दुष्परिणाम पूर्णपणे टाळता येतात, याबाबत सध्या कोणतेही पुरावे नाहीत. मात्र तज्ज्ञांनी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना प्रतिबंधक लसींमुळे होणारे दुष्परिणाम एक इन्फ्लामेटरी रिअ‍ॅक्शन्स आहे. मात्र पाण्याचा दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यास नक्कीच मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशक्तपणा आणि आळस दूर होऊ शकतात

चक्कर येणे आणि अशक्त वाटणे हेदेखील कोरोना प्रतिबंधक लसीचे काही संभाव्य दुष्परिणाम आहेत. ते परिणाम गंभीर नसले तरी भरपूर पाणी प्यायल्यास या परिणामांपासूनही सुटका होऊ शकते. दरम्यान, एका संशोधनानुसार जास्त पाणी पिणे हेदेखील आरोग्यासाठी धोका आहे. यामुळे सोडियमची पातळी खाली येते आणि डोकेदुखी, थकवा येऊ शकतो.

काय केले पाहिजे?

संयुक्त राष्ट्राच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या म्हणण्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर तुम्ही भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तुम्ही डोस घेतल्यानंतर ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याशिवाय विविध फळांचा ज्यूस पिण्यापासूनही तुम्हाला उत्साही वाटू लागेल. तुमच्या शरिरातील ऊर्जा वाढून लसीचा दुष्परिणाम जाणवणार नाही. (Drink plenty of water before taking a dose of corona vaccine; know what expert advice is)

इतर बातम्या

जळगावच्या जामनेर पंचायत समितीत कोट्यवधींचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, उपोषण सुरु

मोठा बंगला, 20 एकरात फार्महाऊस पाहिजे, पुन्हा म्हणते मुलगा ढेकर देणारा नसावा, तरुणीच्या अपेक्षेने भलेभले चक्रावले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI