नाना पाटेकर यांना आवडायची केळ्याच्या फुलाची भाजी, बड्या अभिनेत्याने खिमा समजून खाल्ली; काय आहे किस्सा?
अभिनेता नाना पाटेकर यांना केळ्याच्या फुलाची भाजी खूप आवडते. एकदा तिरंगा सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांनी आणलेला डबा अभिनेते राजकुमार यांनी खाल्ला आणि खिमा समजून त्याची खूप प्रशंसा केली. ही चवदार भाजी तुम्हीही घरी बनवू शकता. या लेखात नानांची आवडती भाजी बनवण्याची सोपी आणि पारंपरिक पाककृती दिली आहे.

अभिनेता नाना पाटेकर यांचं गोव्यात वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. नाना पाटेकर यांच्या अचानक निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचे सिनेमे अधिक चर्चेत असायचे. त्यांची साधी राहणी सुद्धा चर्चेचा विषय होता. त्यांच्या घरी साधं जेवण बनवलं जायचं. त्यांना खासकरून केळ्याच्या फुलाची भाजी प्रचंड आवडायची. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली आवड सांगितली होती. आई केळ्याच्या फुलाची भाजी बनवायची. ती आम्ही आवडीने खायचो. आजही मी ही भाजी खात असतो, असं नानांनी सांगितलं होतं.
आई केळ्याच्या फुलाची भाजी अत्यंत चवदार बनवायची. त्यामुळे ही भाजी कशाची बनली आहे हे खाणाऱ्यांना कळायचे नाही, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी तिरंगा सिनेमाचा एक किस्सा सांगितला. शुटिंगला येताना मी घरून टिफिन घेऊन आलो होतो. केळ्याची भाजी होती. आम्ही जेवायला बसलो तेव्हा अभिनेते राजकुमार यांनी त्यांचं ताट माझ्याकडे सरकवलं आणि माझा टिफिन त्यांनी खायला घेतला. डब्यातलं सर्व संपवल्यानंतर जानी, खिमा अत्यंत चांगला झाला, असं ते आपल्या स्टाईलने म्हणाले. त्यावर ही केळ्याच्या फुलाची भाजी आहे, असं मी त्यांना सांगितलं. नाही नाही… हा खिमाच आहे, असं म्हणत राजकुमार यांनी आपलंच घोडंदामटलं होतं, असा सांगताना नाना पाटेकर खळखळून हसले होते.
केळ्याच्या फुलाच्या भाजीचे साहित्य
1 केळ्याचं फूल घ्या (बारीक कापलेले)
2 कांदा (बारीक कापलेला)
2 टोमॅटो (कापलेले)
2 हिरव्या मिर्च्या
1 छोटा चमचा अद्रक-लसणाची पेस्ट
1/2 छोटा चमचा हळद
1 छोटा चमचा धने पावडर
1/2 छोटा चमचा लाल मिर्च पावडर
1/2 छोटा चमचा गरम मसाला
1/2 छोटा चमचा जीरा
चवीनुसार मीठ
2 मोठे चमचे तेल
गार्निशसाठी कोथिंबीर
फुल कसे स्वच्छ करायचे?
केळ्याच्या फुलाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी त्याची स्वच्छता केली पाहिजे. त्यासाठी केळ्याच्या फुलावरील गडद रंगाचे पत्ते काढून टाका. आतील फुलातील कडक काडी आणि पातळ ट्रान्सपरंट लेअर काढून टाका. आता त्याला बारीक कापून घ्या. हळद-मिठाच्या पाण्यात 15-20 मिनिटे भिजत ठेवा. त्यामुळे कडूसरपणा निघून जाईल.
बनवण्याची पद्धत
1. केळ्याच्या फुलाची भाजी बनवण्यसाठी कापलेल्या फुलांना उकळून घ्या
2. चांगले उकळून घेतल्यावर कढाईत तेल गरम करा. त्यात जिरे टाका. त्यानंतर कांदा टाकून गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्या.
3. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर अद्रक-लसून, हिरव्या मिर्च्या आणि टोमॅटो टाकून मसाला तयार करा. मसाला चांगल्या पद्धतीने शिजल्यावर उकडलेली केळ्याची फुले त्यात टाका
4. आता हळद, धने पावडर, मीठ आणि लाल मिर्च्या टाकल्यावर काही मिनिटापर्यंत शिजवू द्या.
5. शेवटी थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर टाका. तुमच्यासाठी गरमागरम चवदार मसालेदार केळ्याच्या फुलांची भाजी तयार आहे.