AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Pataker : नाना पाटेकर यांचा मृत्यू नेमका कधी झाला, डॉक्टरांचा मोठा खुलास काय?

नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यातील घरीच तब्येत बिघडल्यावर त्यांना मणिपाल रुग्णालयात आणले गेले, परंतु डॉक्टरांच्या माहितीनुसार, ते रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत पावले होते. वेळेवर वैद्यकीय मदत आणि सीपीआर मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Nana Pataker : नाना पाटेकर यांचा मृत्यू नेमका कधी झाला, डॉक्टरांचा मोठा खुलास काय?
nana patekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 5:48 PM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 वर्षी निधन झालं. गोव्यातील घरीच तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांना रुग्णालयात न्यायला उशीर झाला होता. त्यामुळे उशिराने उपचार मिळाळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेवटच्या काळात नेमकं काय घडलं? नाना पाटेकर यांची तब्येत कशी होती? याची माहिती गोव्याच्या मणिपाल रुग्णालयाचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी दिली आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

नाना पाटेकर यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचण्याच्या एक तासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मेडिकल टीम पहाटे 4:18-4:20 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरी गेली होती. जेव्हा मेडिकल टीम त्यांच्या घरी गेली, तेव्हा ते जमिनीवर बेशुद्धावस्थेत होते. त्यांचं शरीर कोणताही प्रतिसाद देत नव्हतं. जेव्हा त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा ते मृतावस्थेत होते. त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला. पण त्यांच्या हृदयाचे ठोके सुरू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांचा मृत्यू 3.30 वाजता झाला असावा असा अंदाज आहे, असं डॉ. शेखर यांनी सांगितलं.

45 मिनिटे सीपीआर दिला जातो…

नानांचा मृत्यू आधीच झाला होता. पण मेडिकल प्रोटोकॉलच्या नुसार एमर्जन्सीत आलेल्या रुग्णाला 45 मिनिटे सीपीआर दिला जातो. रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता असते, त्यामुळे सीपीआर दिला जातो. पण नानांच्या बाबतीत असं झालं नाही, असं डॉ. शेखर म्हणाले. अशा घटनांमध्ये रुग्णांना लवकर वैद्यकीय मदत मिळाली आणि कार्डियक अरेस्टनंतर लगेच सीपीआर दिला तर त्यांची वाचण्याची शक्यता अधिक असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मध्यरात्रीच तब्येत बिघडली

नाना पाटेकर यांची घरी रात्री 1.30 ते 2.30च्या दरम्यान तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांना दरदरून घाम येत होता. त्यांच्या छातीत वेदना होत होत्या. डाव्या हातापर्यंत या वेदना गेल्या होत्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हे सर्व लक्षणे हार्ट अटॅकचे होते. त्यांना घरीच हार्ट अटॅक आला होता अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच त्यांच्या मृत्यूचं निश्चित कारण समोर येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तर वाचले असते

नसांमध्ये ब्लॉकेज आल्याने हार्ट अटॅक येतो. अनेकदा गंभीर हार्ट अटॅकमुळे हृदयाचा इलेक्ट्रिलक ऱ्हिदम बिघडतो. त्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. खरेतर हार्ट अटॅकमध्ये कार्डियक अरेस्ट यायलाच पाहिजे हे आवश्यक नाहीये. कार्डियक अरेस्टचे दुसरे कारणही असतात. परंतु नाना पाटेकर यांना गंभीर अटॅक येऊन कार्डियक अरेस्ट आला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शरीरात ही लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी मित्रांना त्याची माहिती दिली होती. त्याचवेळी जर त्यांना सीपीआर मिळाला असता वा वेळेत त्यांना रुग्णालयात आणलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता. त्यांना रुग्णालयात आणण्यात उशीर झाला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र