डाळीत जास्त मीठ आणि पीठही जास्त पातळ झालयं? या हॅक्सच्या मदतीने 1 मिनिटांत होईल सर्व नीट

बऱ्याचदा जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा डाळीत जास्त मीठ पडते किंवा कधीकधी डाळ कुकरमधून शिजवताना बाहेर येते. जर तुम्हालाही स्वयंपाक करताना अशा समस्या येत असतील तर आजच्या लेखात काही किचन हॅक्स जाणून घेणार आहेत ज्या फक्त एका मिनिटात तुमचं काम नीट करतील.

डाळीत जास्त मीठ आणि पीठही जास्त पातळ झालयं? या हॅक्सच्या मदतीने 1 मिनिटांत होईल सर्व नीट
Kitchen Hacks
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 8:14 PM

दररोज स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना आपण अनेकदा काही छोट्या चुका करतो. त्यापैकी एक सामान्य चुक म्हणजे भाज्यांमध्ये जास्त मीठ पडणे किंवा पीठ जास्त पातळ होणे किंवा एखादी भाजी खूप मसालेदार होणे. यामुळे पदार्थांची चव बदलते. कधी कधी अशा चुका आपल्याकडून घरात पाहूणे आल्यावर होतात. तेव्हा आपल्याला असं वाटत की आती ही भाजी किंवा डाळ खाण्यायोग्य नाही कसं नीट करावे अशी चिंता सतावू लागते. पण अशा वेळेस घाबरून न जाता स्वयंपाकघरात असे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे तुम्हाला या समस्येतून बाहेर काढू शकतात आणि तुम्ही बनवलेल्या पदार्थाची चव पुन्हा एकदा परिपूर्ण बनवू शकतात.

अशातच तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात झालेला गोंधळ काही मिनिटांत आणि कोणत्याही भीतीशिवाय नीट करायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण काही झटपट टिप्स सांगणार आहोत जे स्वयंपाकघरातील प्रत्येक चुका कमीत कमी वेळेत दुरुस्त करतील आणि तुम्हाला एक घरगुती सुपर शेफ बनवतील.

डाळीमध्ये जास्त मीठ असल्यास काय करावे?

बऱ्याचदा असे घडते की डाळ किंवा भाज्या शिजवताना आपण चुकून जास्त मीठ घालतो. जर जेवण बनवताना तुमच्याकडूनही चूक झाली असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. डाळीमध्ये मीठ कमी करण्यासाठी, कच्च्या बटाट्याचे 2-3 छोटे तुकडे करा आणि ते डाळीत टाकून शिजवा. बटाटे डाळीतील जास्त मीठ शोषून घेतात. पर्यायी म्हणून, तुम्ही पिठाचे गोळे बनवून डाळीमध्ये पडलेलं जास्त मीठ कमी करू शकता.

पीठ जास्त पातळ झाल्यास कसे दुरुस्त करावे

कधीकधी पीठ मळताना जास्त पाणी पडले की पीठ पातळ आणि चिकट होते. अशा परिस्थितीत जास्त पातळ झालेल्या पीठात ताबडतोब कोरडे पीठ मिक्स करून पीठ मळून घ्या. नंतर तुमच्या हातांना थोडे पाणी लावा आणि पीठ मऊ करा.

भाजीत जास्त तेल असल्यास काय करावे?

तुमच्या कडून जर भाजीत जास्त तेल घातलं गेलं तर त्यात थोडे बेसन किंवा ब्रेडचा तुकडा टाका आणि काही मिनिटे भाजी पुन्हा शिजवा. अशाने ब्रेड किंवा बेसन तेल शोषून घेते आणि भाजीची चव खराब न करता चवदार होते. बर्फाचा तुकडा घातल्याने देखील भाजीतले जास्तीचे तेल कमी होते. तथापि बर्फ घातल्यानंतर तुम्हाला भाजी शिजवण्याची गरज नाही.

डाळ कुकरमधून बाहेर येणार नाही.

डाळ शिजवताना अनेकदा कुकरच्या शिट्टीच्या आजूबाजूने बाहेर पडते. हे टाळण्यासाठी तुम्ही कुकरमध्ये डाळीत थोडे तेल टाकू शकता. पर्यायी म्हणून डाळ शिजवताना त्यावर एक स्टीलची वाटी ठेवा. यामुळे डाळ बाहेर पडण्यापासून देखील रोखले जाते.

जळलेल्या दुधाच्या भांड्याला क्षणार्धात स्वच्छ करा

दुधाचं पातेलं जळाला तर काळजी करण्याची गरज नाही. या पातेल्यात एक कप पाणी आणि 1-2 चमचे बेकिंग सोडा किंवा डिशवॉशिंग लिक्विड टाका आणि ते थोडे वेळ उकळवा. जळलेली जागा स्वतःहून सैल होईल आणि स्पंजने सहज साफ करता येईल. तुम्ही या पातेल्यात लिंबाचा रस टाकूनही स्वच्छ करू शकता.

भाज्यांचा तिखटपणा कसा कमी करायचा?

भाजीत जास्त मिरची पावडर टाकली तर तिचा तिखटपणा वाढतो, तर भाजीतला तिखटपणा कमी करण्यासाठी भाजीत थोडे दही किंवा क्रीम टाका. यामुळे तिखटपणा कमी होतो आणि चव वाढते. जर भाजी ग्रेव्ही डिश असेल तर उकडलेले बटाटे किंवा टोमॅटो घातल्याने तिखटपणा कमी होऊ शकते, कारण ते तिखटपणा शोषून घेतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)