रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस पिण्याचे आहेत अनेक फायदे, आरोग्यासोबत सौंदर्यालाही मिळेल नवी चमक

Benefits of Carrot Juice: फक्त आरोग्यासाठीच नाही तर तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठीही गाजर फायदेशीर आहे. गाजरमध्ये अनेक पोषक घटक असतात. याचे ज्यूस रोज प्यायल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.

रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस पिण्याचे आहेत अनेक फायदे, आरोग्यासोबत सौंदर्यालाही मिळेल नवी चमक
गाजराचा ज्यूस पिण्याचे आहेत अनेक फायदे
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 19, 2026 | 4:39 PM

सलाद असो, बिर्याणी असो किंवा गाजराचा स्वादिष्ट हलवा, या पदार्थांमध्ये गाजराचा वापर चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढवतो. गाजर केवळ खाण्याची चव वाढवत नाही, तर आरोग्य आणि सौंदर्याची काळजी घेण्यासाठीही उपयुक्त ठरते. गाजरामध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे शरीर निरोगी ठेवण्यासोबतच त्वचेचा तजेलदारपणा टिकवण्यासही मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात गाजराचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. विशेषतः सकाळी एक ग्लास ताज्या गाजराचा ज्यूस प्यायल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. वजन नियंत्रणात ठेवण्यापासून त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत गाजराचा ज्यूस कसा फायदेशीर ठरतो, जाणून घेऊया.

डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी गाजराचा रस खूप फायदेशीर मानला जातो. गाजरात आढळणारे व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांना अनेक आजारांपासून वाचवून निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Loading...

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

गाजराच्या रसमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवते

गाजरच्या रसामध्ये आढळणारे पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

वजन कमी करण्यात फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्या वेट लॉस डायटसाठी गाजराचा रस हा एक उत्तम पर्याय असू शकतो. गाजराच्या रसमध्ये कमी कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यासोबतच चयापचय व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकतात. गाजराचा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रणात ठेवते

मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खावे. असे अन्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. गाजरच्या रसमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते चांगले मानले जाते.

त्वचेची चमक वाढवते

गाजरच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवून कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. गाजराच्या रसामध्ये असलेले कॅरोटीनोइड्स त्वचेला अतिनील हानीपासून वाचवतात. गाजरातील फायबर आणि प्रथिने त्वचेची लवचिकता राखून त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चमकदार दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us