उन्हाळ्यात ओठ काळपट होतात? मग, ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा

| Updated on: May 26, 2021 | 2:33 PM

आपले ओठ सौंदर्यात आणखी भर घालतात. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे आणि योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आपल्या ओठांचा रंग फिकट होऊ लागतो.

उन्हाळ्यात ओठ काळपट होतात? मग, हे घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा
ओठ
Follow us on

मुंबई : आपले ओठ सौंदर्यात आणखी भर घालतात. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे आणि योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आपल्या ओठांचा रंग काळपट होऊ लागतो. याव्यतिरिक्त, हळूहळू ओठांचा नैसर्गिक ओलावा देखील कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत आपण चेहऱ्यासह ओठांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामध्येही उन्हाळ्याच्या हंगामात ओठांवर काळवट पणा येतो. ओठांवरील काळवटपणा घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Lips get darker in summer then try this home remedy)

सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर ओठ स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर एक चमचा कच्चे दूध घ्या आणि ओठांवर चोळा यामुळे आपल्या ओठांवर आलेला काळपटपणा निघून जातो. ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण मध आणि एव्हकाडो मिसळून हायड्रेटिंग लिप मास्क तयार करू शकता. यासाठी, एका भांड्यात एक चमचा मध, 2 चमचे पिकलेले एव्हकाडो मिसळा. मात्र हे मिश्रण आपल्या आठोवर लावा. हे मिश्रण आपल्या ओठांना जास्त काळ हायड्रेट ठेवेल आणि ओठांची त्वचा फुटणार नाही.

ओठांच्या समस्या दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो. जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.

डाळिंब आणि साय यांचा लीप मास्क बनवण्यासाठी एका वाटीत प्रथम डाळिंबाचा रस घ्या आणि त्यात दुधाची ताजी साय आणि व्हिटामिन ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने कोमट पाण्याने ओठ स्वच्छ धुवा. ओठांच्या समस्या दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Lips get darker in summer then try this home remedy)