LPG गॅसची गरजच नाही, ‘या’ मार्गांनी बनवू शकता सर्व स्वयंपाक; तिसरा पर्याय तर सर्वांत बेस्ट

इरण, इस्त्रायल आणि अनेरिका यांच्यात सुरु असलेल्या तणावाचे परिणाम आहे, महाराष्ट्रात देखील दिसू लागले आहेत... सिलेंडरची कमतरता भासत आहे. अशात, गॅस शिवाय तुम्ही या मार्गांनी सर्व स्वयंपाक बनवू शकता...

LPG गॅसची गरजच नाही, या मार्गांनी बनवू शकता सर्व स्वयंपाक; तिसरा पर्याय तर सर्वांत बेस्ट
| Updated on: Mar 11, 2026 | 12:45 PM

इरण, इस्त्रायल आणि अनेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. नुकताच, एलपीजी गॅसच्या किमतीत देखील 60 रुपयांनी वाढ झाली. तर व्यावसायिक सिलेंडरही जवळपास 115 रुपयांनी महाग झाले आहेत. एवढंच नाही तर, ऑनलाईन सिलेंडर बूक होत नसल्यामुळे अनेकांना गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्या आहेत. त्यामुळे सिलेंडर संपल्यानंतर अन्न शिजवायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे… त्यामुळे जाणून घ्या गॅसशिवाय देखील सहज स्वयंपाक कसा करता येईल…

इंडक्शन – गॅसचा पुरवठा कमी झाला तर इंडक्शन हा सर्वात सोपा आणि आधुनिक पर्याय ठलेर. हा वीजेवर चालतो आणि गॅसच्या तुलनेत अन्न लवकर शिजवतो, त्याचप्रमाणे ऊर्जेचीही बचत करतो. आजकाल अनेक घरांमध्ये इंडक्शन कुकटॉपचा वापर वाढत आहे, कारण तो वापरण्यास सोपा आहे आणि त्यामध्ये आगीचा धोका देखील कमी असतो. चहा, डाळ, भाजी किंवा भात यांसारखे रोजचे पदार्थ यात सहज बनवता येतात. मात्र, यासाठी इंडक्शन बेस असलेली भांडी आवश्यक असतात. अशी भांडी बाजारात सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असतात.

मायक्रोवेव्ह ओव्हन : मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर अनेकदा फक्त अन्न गरम करण्यासाठी केला जातो, पण त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ शिजवता देखील येतात. भाजी, डाळ, पास्ता किंवा केक यांसारख्या गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये सहज बनवता येतात. भाज्याही यात शिजवता येतात. आधुनिक मायक्रोवेव्हमध्ये विविध कुकिंग मोड दिलेले असतात, जे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यास मदत करतात. सिलेंडर संपल्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन स्वयंपाकघरात खूप उपयुक्त ठरू शकतो. मायक्रोवेव्ह ओव्हन साधारणपणे 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध असतो.

चूल : चुलीवरचं जेवण अनेकांना आवडतं. भारताच्या ग्रामीण भागात आजही लाकूड आणि गोवऱ्यांवर चालणाऱ्या पारंपरिक चुलींचा वापर केला जातो. गॅसची कमतरता किंवा वीज नसल्याच्या परिस्थितीत हा उपाय उपयोगी ठरू शकतो. या चुलींमध्ये लाकूड किंवा शेणाच्या गोवऱ्या पेटवून अन्न शिजवले जाते. जरी यात जास्त धूर निघतो आणि अन्न शिजवायला थोडा अधिक वेळ लागतो, तरीही आपत्कालीन परिस्थितीत हा पारंपरिक मार्ग अनेक घरांसाठी आधार ठरू शकतो.

स्टीमर : अन्न शिजवण्यासाठी वापरला जाणारा स्टीमर हा देखील एक स्वस्त आणि चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये अन्न शिजवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे पोषक तत्त्वे टिकून राहतात, कमी तेलात किंवा तेलाशिवाय अन्न तयार होते आणि पदार्थांचा नैसर्गिक स्वाद आणि रंग कायम राहतो. स्टीमरमध्ये भाज्या शिजवण्याबरोबरच मोमोज, इडली, ढोकळा, खमन आणि नूडल्स यांसारखे पदार्थ बनवता येतात. हा उपकरण साधारणपणे 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीतही उपलब्ध असतो.

एअर फ्रायर : एअर फ्रायर हे असे किचन उपकरण आहे, ज्याचा वापर खूप कमी तेलात अन्न बनवण्यासाठी केला जातो. गॅस संपल्यावर त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी करता येऊ शकतो. एअर फ्रायरमध्ये फ्रेंच फ्राइज, समोसा, पकोडे, पनीर टिक्का, कटलेट, कुकीज आणि केक यांसारखे अनेक पदार्थ बनवता येतात. याचा फायदा म्हणजे कमी तेल चविष्ट पदार्थ तयार होतात आणि गॅसची गरजही भासत नाही. त्यामुळे आजकाल अनेकांच्या घरांमध्ये हे हेल्दी कुकिंगसाठी चांगला पर्याय ठरत आहे. एअर फ्रायर साधारणपणे 2000 ते 5000 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळतो.

केरोसीन स्टोव्ह : ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये जिथे विजेची समस्या असते, तिथे आजही केरोसीन स्टोव्हचा वापर केला जातो. हा तेलावर चालतो आणि त्यासाठी विजेची गरज नसते. त्यामुळे गॅसची कमतरता भासल्यास हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. मात्र, याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक असते, कारण यात आग आणि धुराचा धोका जास्त असतो. तरीही बॅकअप पर्याय म्हणून याचा उपयोग करता येऊ शकतो.

शेगडी आणि कोळशाची चूल : शेगडी ही अन्न शिजवण्याची एक जुनी पण उपयोगी पद्धत आहे. अनेक शहरांमध्ये आजही लोक हिवाळ्यात किंवा गॅस संपल्यावर सिगडीचा वापर करतात. शेगडीचा वापर साधारणपणे उघड्या किंवा हवेशीर ठिकाणी करणे अधिक सुरक्षित मानले जाते, कारण यातून धूर निघतो. तरीही गॅसची कमतरता भासल्यास हा एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो.

संकटाच्या काळात उपयोगी ठरणारे कुकिंग पर्याय

जागतिक तणाव आणि ऊर्जा संकटामुळे गॅस व इंधनाच्या किमती वाढणे ही नवी गोष्ट नाही. भविष्यात गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्यास लोकांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागू शकतो. इंडक्शन, मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर यांसारखी आधुनिक उपकरणे तसेच लाकूड, शेगडी आणि केरोसीन स्टोव्हसारख्या पारंपरिक पद्धती असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्य माहिती आणि थोडी तयारी असल्यास कोणत्याही परिस्थितीत घरातील चूल पेटती ठेवता येऊ शकते.

 

Follow Us