कापूर आणि लिंबाच्या मदतीने बनवा एअर फ्रेशनर, काही क्षणातच घरातील दुर्गंधी होईल दूर

घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रत्येकजण रूम फ्रेशनर वापरतो. ही समस्या बहुतेकदा स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा बंद खोल्यांमध्ये जास्त जाणवते. यासाठी तुम्ही लिंबू आणि कापराच्या मदतीने अगदी सोप्या आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून घरच्या घरी एअर फ्रेशनर बनवू शकता. चला तर मग हा एअर फ्रेशनर कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

कापूर आणि लिंबाच्या मदतीने बनवा एअर फ्रेशनर, काही क्षणातच घरातील दुर्गंधी होईल दूर
| Edited By: | Updated on: May 05, 2026 | 3:27 PM

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे घरांमध्ये दमटपणा जाणवतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या घरात स्वयंपाकघरा शिजवलेल्या अन्नाचा वास येतो. तर कधी डस्टबिनमधून येणार घाण वास घरभर पसरतो. यामुळे घरामध्ये कधीकधी विचित्र वास येतो. तर हाच दुर्गंध दूर करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले एअर फ्रेशनर आणतो जो की केमिकलच्या घटकांनी भरलेला असतो. हे एअर फ्रेशनर आरोग्यास धोकादायक ठरू शकतात. अशावेळी नैसर्गिक आणि घरगूती घटकांच्या साहाय्याने तयार केलेले एअर फ्रेशनर वापरणे एक उत्तम उपाय ठरतो. जो तुमच्या घराला ताजेतवाने आणि सुगंधित ठेवेल. जर तुम्ही सोपा आणि नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर कापूर आणि लिंबूपासून तयार एअर फ्रेशनर उपयुक्त ठरू शकते. चला तर मग याबद्दल आपण जाणून घेऊयात.

हा घरगुती एअर फ्रेशनर खास का आहे?

कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे हवेतील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जिवाणूंना नष्ट करण्यास मदत करतात. लिंबाचा आल्हाददायक सुगंध घराला त्वरित ताजेतवाने करतो. हे मिश्रण नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहे.

एअर फ्रेशनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य?

कापराचे 4-5 तुकडे

1 ताजे लिंबू

एक लहान वाटी

थोडे पाणी

एअर फ्रेशनर कसा बनवायचा?

सर्वप्रथम लिंबू दोन भागांत कापून घ्या.

आता एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात कापराचे तुकडे टाका.

यानंतर त्याच भांड्यात लिंबाचे तुकडेही टाकून ढवळून घ्या.

आता ही वाटी खोलीच्या तसेच किचनच्या किंवा हॉलच्या कोपऱ्यात ठेवा.

थोड्याच वेळात खोलीभर लिंबू आणि कापराचा सुगंध पसरू लागेल.

त्याचा वापर कुठे करता येईल?

तुम्ही हा एअर फ्रेशनर लिविंग रूम, स्वयंपाकघरात, बाथरूम किंवा बेडरूममध्ये ठेवू शकता.

हा एअर फ्रेशनर विशेषतः बंद खोल्या आणि दमट भागांसाठी फायदेशीर आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

सुगंध टिकवून ठेवण्यासाठी दर 2-3 दिवसांनी लिंबू बदला.

कापूर संपल्यास, त्यात नवीन तुकडे टाका.

लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.

ही पद्धत का वापरून पाहावी?

हा एअर फ्रेशनर पूर्णपणे नैसर्गिक असून त्यात कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. तो केवळ तुमच्या घरातील दुर्गंधीच नाहीशी करत नाही, तर वातावरण ताजे आणि सकारात्मक ठेवतो. जर तुम्ही सोपा आणि स्वस्त उपाय शोधत असाल, तर या उपायाचा विचार करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us